Tuesday, March 25, 2025
Homeनाशिकनाशिक महानगरपालिकेला मिळणार लवकरच नवे आयुक्त?

नाशिक महानगरपालिकेला मिळणार लवकरच नवे आयुक्त?

पालकमंत्री जाहीर झाल्यावर बदली होण्याची चर्चा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक मनपाचे (Nashik NMC) वादग्रस्त आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर (Dr. Ashok Karanjkar) यांची बदली होऊन लवकरच नाशिक मनपाला नवीन आयुक्त (New Commissioner) मिळणार असल्याची चर्चा रंगत आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पालकमंत्री जाहीर झाल्यावर आयुक्तांची बदली होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

भुसंपादनाचे ठरावीक बिल्डरांना रात्रीतून ५५ कोटी रुपये प्राधान्यक्रम डावलून देणे असो की विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) आचारसंहिता लागण्यापुर्वी एका विशिष्ठ ठेकेदाराला सुमारे २०० कोटींचा शहर सफाईचा ठेका मिळावा, म्हणून किरकोळ रजेवर गेलेल्या अधिकाऱ्यांचा चार्ज रात्री ८ वाजता दुसऱ्याला देऊन त्वरीत निविदा प्रसिध्द करण्याचा प्रकार असो, यामुळे वादात सापडलेले आयुक्तांची बदली व्हावी, अशी मागणी मागील काही काळापासून सातत्याने होत आहे. मात्र निवडणुकीमुळे बदली रखडत होती, मात्र आता पालकमंत्री जाहीर झाल्यावर आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची बदली होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

सध्या राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला (Nagpur) सुरू आहे. अशा वेळी वरिष्ठ अधिकारी सहसा सुट्टी घेत नाही, मात्र महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर हे अचानकपणे मंगळवार (दि. १७) पासून आठवडाभर रजेवर गेले आहे. वैद्यकीय कारणात्सव ते रजेवर गेल्याचे सांगितले जात असले तरी त्याचवेळी त्यांच्या बदलीची चर्चाही सुरू झाली आहे. महापालिकेच्या काराभाराविषयी शहरातील लोकप्रतिनिधींच्या अनेक तक्रारी असतांनाच आयुक्त रजेवर गेल्याने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

महायुती सरकार (Mahayuti Government) सत्तेवर आल्यानंतर नागपूरात अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे अधिवेशन कालावधीत अधिकाऱ्यांना सुट्टीवर न जाता मुख्यालयी थांबण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. असे असतांना डॉ. अशोक करंजकर मंगळवारपासून अचानक वैद्यकीय कारणास्तव आठवडाभर रजेवर गेले आहेत. पायाला दुखापत झाल्यामुळे आयुक्त रजेवर गेल्याचे आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीपासून आयुक्त बदलीच्या (Replacement) प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ते नाशिक महापालिकेत काम करण्यास इच्छुक नसल्यानेच त्यांचे महापालिकेतील कारभाराकडेही फारसे लक्ष नसल्याचे पहावयास मिळते. अनेक वेळा ते कार्यालयात नसतात. त्याच प्रमाणे कार्यालयात असले तरी माजी नगरसेवकांसह इतरांना भेटत नसल्याच्या तक्रारी आहे. सुमारे दिड वर्षावर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्याचे चोख नियोजन सुरू असतांना सक्षम अधिकारी मनपाला मिळावा, अशी भावना व्यक्त होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...