नाशिक | प्रतिनिधी
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका प्रशासनाकडून श्री गणेश विसर्जनासाठी २७ नैसर्गिक, तर ५६ कृत्रिम तलावांचे नियोजन करण्यात आले आहे. विसर्जन करताना पीओपी मूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली असून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांकरिता विसर्जनासाठी पारंपरिक २७ ठिकाणांबरोबरच जलप्रदूषण टाळण्यासाठी ५६ कृत्रिम तलावांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
विभागनिहाय नैसर्गिक विसर्जन स्थळे
पूर्व : लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ, मनपा एसटीपी परिसर- आगर टाकळी, नंदिनी गोदावरी संगम.
सातपूर : गंगापूर धबधबा, सोमेश्वर, चांदशी पूल, मते नर्सरी पूल.
नाशिकरोड : चेहेडी नदी किनारा, पंचक गोदावरी नदी स्वामी जनार्दन पुलालगत, दसक गाव नदीतीरी, वालदेवी नदीतीरी देवळाली, विहीतगाव, वालदेवी नदीतीरी.
पंचवटी : सीता सरोवर, नांदूर-मानूर, आडगाव पाझर तलाव, तपोवन, रामकुंड परिसर, टाळकुटेश्वर सांडवा.
पश्चिम : यशवंत महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, सिद्धेश्वर मंदिर, घारपुरे घाट, हनुमान घाट.
विभागनिहाय विसर्जन स्थळे
सिडको : गोविंदनगर सामाजिक सभागृह, जिजाऊ वाचनालय, राजे संभाजी स्टेडियम, अश्विननगर, हिरे विद्यालय, पवननगर (कृत्रिम तलाव), पिंपळगाव खांब, वालदेवी नदी घाट. अंजना लॉन्स, गामणे मैदान, मिनाताई ठाकरे, डे केअर स्कूल, अंबड पोलीस स्टेशन चौक, सिंहस्थनगर
नाशिक पश्चिम : सिद्धेश्वर मंदिर घारपुरे घाट, हनुमान घाट अशोक स्तंभ, जॉगिंग पार्क, चोपडा लॉन्स पूल, फॉरेस्ट नर्सरी पूल, दोंदे पूल उंटवाडीरोड म्हसोबा मंदिर, येवलेकर मळा, बॅटमिंटन हॉल, महात्मानगर पाण्याची टाकी, लायन्स क्लब, महापालिका विभागीय कार्यालय.
सातपूर : गंगापूर धबधबा, सोमेश्वर मंदिर, आसाराम बापू पूल, सूर्या मर्फी चौक. आयटीआय पूल (नासर्डी पूल), अशोकनगर पोलिस चौकी, शिवाजीनगर, पाइपलाइनरोड, अंबड लिंकरोड (नासर्डी पूल) नाशिकरोड : नारायण बापु चौक, राजराजेश्वरी चौक, तानाजी मालसुरे
क्रीडांगण, शासकीय तंत्रनिकेतन, निसर्गोपचार केंद्रासमोरील क्रीडांगण, के. एन. केला शाळे समोरील भाजी मार्केट, शिखरेवाडी मैदान, गाडेकर मळा, मनपा शाळा क्र. १२५
नाशिकपूर्व रामदास स्वामी मठ, लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी नगर, नंदिनी गोदावरी संगम, साईनाथ नगर चौफुली – एक, डीजीपीनगर, शारदा शाळे समोर, कलानगर चौक
पंचवटी : पेठरोड आरटीओ कॉर्नर, दत्तचौक गोरक्षनगर, वाघाडी नदी राजमाता मंगल कार्यालय, नांदूर-मानुर गोदावरी संगम, कोणार्क नगर, आडगांव पाझर तलाव, म्हसरुळ सीता सरोवर, तपोवन कपील, संगम, प्रमोद महाजन उद्यानजवळ रासबिहारी शाळेजवळ, रामवाडी चिंचवन, कमलगनर, रोकडोबा सांडवा ते गौरीपटांगण.
नवीन नाशिक : पिंपळगाव खांब वालदेवी घाट.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा