Sunday, January 11, 2026
HomeराजकीयNashik MC Politics : निवडणुका लढले पण 'त्या' पदाने हुलकावणी दिल्याने पाटी...

Nashik MC Politics : निवडणुका लढले पण ‘त्या’ पदाने हुलकावणी दिल्याने पाटी कोरीच राहिली

नाशिक | विजय गिते | Nashik

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) म्हटलं की, येथेच विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा व राज्यसभेच्या राजकारणाचं बाळकडू मिळतं. त्यामुळेच राजकारणातील यशाची पहिली पायरी म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. ग्रामपंचायतपासून ते संसद भवनापर्यंतचा हा राजकीय प्रवास अनेकांसाठी स्वप्नवत असतो. नाशिक महानगराने असे अनेक चेहरे पाहिले आहेत, ज्यांनी नगरसेवक म्हणून सुरुवात करून थेट संसदेत मजल मारली.

- Advertisement -

तसेच डझनभर नगरसवेक (Corporators) असेही आहेत, ज्यांना अनेक संधी असूनही हुलकावणी दिल्याने विधानसभा, विधानपरिषदेची पायरी चढता आलेली नाही. नाशिक महानगरपालिकेतील तब्बल एक डझन नगरसेवकांनी पुढचे पाऊल टाकत आमदार, मंत्री आणि खासदार होण्याचा मान मिळविला आहे. ही उदाहरणे स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारण किती प्रभावी ठरू शकते, हे अधोरेखित करतात. या सर्व उदाहरणांमुळे नाशिक (Nashik) हे स्थानिक राजकारणातून राज्य व राष्ट्रीय नेतृत्व घडविणारे शहर म्हणून ओळखले जाते.

YouTube video player

वरून खाली आलेले नेते

नाशिकच्या राजकारणात (Nashik Politics) काही अपवादात्मक उदाहरणे देखील आहेत. यामध्ये स्व. गणपतराच काठे हे आधी आमदार झाले, त्यानंतर महानगरपालिकेत नगरसेवक झाले. स्व. शांताराम बापू वावरे यांनी प्रथम विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले, नंतर ते नगरसेवक व महापौर झाले. स्व. डॉ. प्रतापदादा सोनवणे हे विधान परिषदेचे आमदार, लोकसभेचे खासदार झाले. मात्र, त्यांना नाशिक महानगर पालिकेचे नगरसेवक होता आले नाही.

संधी असूनही अपयशाची छाया विविध संधी मिळालेले डझनभर असले तरी

दुसरीकडे, नाशिकमध्येच तब्बल एक डझन असे नगरसेवक आहेत, ज्यांनी अनेक वेळा नगरसेवक, उपमहापौर, महापौर किंवा स्थायी समिती सभापती अशी महत्वाची पदे भूषवली. मात्र, विधानसभा किंवा विधानपरिषदेची दारे त्यांच्यासाठी उघडली नाहीत. लोकसभा तर दूरच आहे. दशरथ पाटील, विनायक पांडे, अजय बोरस्ते, बाबा सद‌मुळे, अशोक दिवे यांच्यासारख्या नेत्यांनी महानगरपालिकेत नगरसेवक, स्थायी समिती सभापती, उपमहापौर, महापौर अशी सर्वोच्च पदे भूषवली; परंतु विधानसभा, विधानपरिषद व लोकसभा निवडनुकांमध्ये त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. तसेच दिनकर आढाव, सुधाकर बडगुजर, दिनकर पाटील, गणेश गिते, दिलीप दातीर, हेमलता पाटील, शाहू खैरे हे नगरसेवक व स्थायी समिती सभापती झाले. मात्र, आजही विधानसभेची पायरी त्यांच्या वाट्याला आलेली नाही.

राजकीय वास्तव

गावपातळीपासून संसदेपर्यंतच्या राजकारणात पक्षीय राजकारण, जातीय समीकरणे, नेतृत्व गुण, जनसंपर्क, योग्य वेळी आलेली संधी. या सर्व बाबींचा यात मुख्यत्वे समावेश असतो. नाशिक महानगराने यशस्वी राजकारणी घडविले आहेत, तसेच अनेक सक्षम नेत्यांना योग्य संधी न मिळाल्याची देखील उदाहरणेही आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारण हे केवळ नगरसेवक पदापुरते मर्यादित नसून, ते राज्य व राष्ट्रीय नेतृत्वाची नांदी ठरू शकते. मात्र, प्रत्येकासाठी हा प्रवास यशस्वी ठरेलच, असे नाही, नाशिकचे राजकीय चित्र हे यश, अपयश, संधी आणि संघर्ष यांचे जिवंत प्रतिबिंब आहे.

ताज्या बातम्या

संजय

११ लाखांची पैंज लावतो! संजय राऊतांचे मुख्यमंत्री फडणवीसांना थेट आव्हान; म्हणाले,...

0
मुंबई | Mumbaiराज्यातील महापालिका निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा उमेदवार आणि त्या पक्षाची नेतेमंडळी मतदारांच्या दारोदारी जाऊन आपला प्रचार...