Saturday, January 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Municipal Election: नाशकात प्रचार तोफा धडाडणार; ठाकरे बंधूंची आज संयुक्त सभा

Nashik Municipal Election: नाशकात प्रचार तोफा धडाडणार; ठाकरे बंधूंची आज संयुक्त सभा

नाशिक | प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार आता रंगात येऊ लागला असून, आजपासून शहरात सभांच्या माध्यमातून नेत्याच्या तोफा धडाडणार आहेत. आश्वासनांची खैरात, आरोप-प्रत्यारोप यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

महापालिका निवडणूक प्रचारातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिलीच संयुक्त सभा शुक्रवारी (दि.९) नाशिकमध्ये होत असल्याने शहरासह संपूर्ण राज्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे.

- Advertisement -

ठाकरे बंधूंच्या सभेनंतर अवघ्या दोन दिवसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ११ जानेवारी रोजी जाहीर सभा होणार आहे. ठाकरे बंधूंच्या सभेतून भाजपवर जोरदार टीका होण्याची शक्यता असल्याने, त्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस काय प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अस्तित्वाच्या लढाईसाठी ठाकरे गटाची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे. नाशिक पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला बनवण्याच्या उद्देशाने ठाकरे बंधू शुक्रवारी हुतात्मा अनंत कान्हो मैदानावर संयुक्त सभा घेणार आहेत.

YouTube video player

या सभेबाबत दोन्ही पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. सभेसाठी आवश्यक परवानगी आधीच घेण्यात आली आहे. दरम्यान, भाजपने सुरुवातीपासून महायुतीतील मित्रपक्षांना संभ्रमात ठेवत ऐनवेळी स्वबळाचा नारा दिल्याने मित्रपक्षांमध्ये नाराजी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपला घड्डा शिकवण्यासाठी शिंदेसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील अनेक प्रभागांमध्ये भाजपसमोर या दोन्ही पक्षांचे कड़वे आव्हान उभे राहिले आहे.

महापालिकेचे रणांगण पुन्हा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ११ जानेवारी रोजी नाशिकमध्ये सभा घेणार आहेत, २०१७ मध्ये त्यांनी ‘दत्तकनाशिक’ची घोषणा केली होती. यावेळी ते नाशिकसाठी कोणत्या नव्या घोषणा करतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत युती, नाशिकमध्ये का नाही ?
शिंदेसेनेचा भाजपवरील राग अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. मुंबईत आम्ही एकत्र चालतो, मग नाशिकमध्ये का नाही? असा सवाल शिंदेसेनेचे नेते खासगीत भाजपला करत असल्याची चर्चा आहे. याच कारणावरून भाजपविरोधातील नाराजी वाढत असून, भाजपला बाजूला ठेवून नाशिक महापालिकेवर शिंदेसेना व राष्ट्रवादीचा महापौर बसवण्याचे दावे केले जात आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

देशदूत ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पोला’ शानदार सुरुवात

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपूर सुविधा आणि वाजवी मूल्य या चतु:सूत्रीचा संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या 'देशदूत' आयोजित तसेच ‘ए. सी....