Tuesday, September 24, 2024
Homeमुख्य बातम्यामनपाचा शासनाकडे प्रस्ताव; 'इतक्या' सहाय्यक आयुक्तांच्या नियुक्तीची मागणी

मनपाचा शासनाकडे प्रस्ताव; ‘इतक्या’ सहाय्यक आयुक्तांच्या नियुक्तीची मागणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

मनपाच्या प्रशासकीय (Municipal Administration) कामकाजाला गती देण्यासाठी मनपाच्या सेवेत 12 सहाय्यक आयुक्तांची (Assistant Commissioner) नियुक्त करण्याची मागणी महापालिकेकडून राज्याच्या नगरविकास विभागाकडे (Department of Urban Development) करण्यात आली आहे.

महापालिकेत गेल्या 21 वर्षांपासून नोकरभरती (recruitment) झालेली नाही. विभागीय अधिकारी (Divisional Officer), सहाय्यक आयुक्त (Assistant Commissioner) दर्जाची पदं रिक्त असल्यामुळे महापालिकेच्या कामकाजात मोठ्या अडचणी येत आहेत. सातत्याने निवृत्त होणार्‍या अधिकार्‍यांमुळे अधिकार्‍यांवर अतिरिक्त भार दिला जात असल्याने कामाचा मोठा ताण वाढत आहे.

त्यामुळे मनपाच्या सेवक वर्गात 12 सहाय्यक आयुक्तांची पदं देखील परसेवेतून भरली जाणार असून त्यासाठी महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे मनपा आयुक्त डॉ. पूलकूंडवार (Municipal Commissioner Dr. PulKundwar) यांनी सांगितले. त्यामुळे या पदावर शासन प्रतिनियुक्तीने अधिकार्‍याची नियुक्ती केली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

भूसंपादनासाठी हवा उपजिल्हाधिकारी

मनपाच्या आरक्षण टाकलेल्या जागांचे भूसंपादन गतीमान पध्दतीने करण्यासाठी मनपाच्या भूसंपादन विभागासाठी देखील महापालिकेला उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी हवा आहे. महापालिकेने शासनाकडेअधिकार्‍याच्या मागणीचा प्रस्ताव पाठवलेला आहे. त्याद्वारे महापालिकेच्या भूसंपादन आणि मिळकत विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणली जाणार आहे.व शहरातील मनपाच्या जागा ताब्यात घेणे सूलभ होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या