Saturday, June 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik NCP News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा क्रमांक एकवर नेणार - जिल्हाध्यक्ष...

Nashik NCP News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा क्रमांक एकवर नेणार – जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांचा विश्वास

नाशिक | Nashik

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार पार्थ पवार, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, यांच्यासह पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी ऋणी आहे. त्यांनी दाखविलेला विश्वास आपण सार्थ ठरवू. आगामी काळात नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा क्रमांक एकवर नेऊ असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे (Dilip Khaire) यांनी केले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर आज जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी राष्ट्रवादी भवन मुंबई नाका (Mumbai Naka) नाशिक येथील कार्यालयात आज पदभार स्वीकारला. तसेच यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील पदाधिकारी व कर्त्यांची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्षपदी दिलीप खैरे यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक दिवसांनंतर राष्ट्रवादी भवन पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या उत्साहाने गजबजून गेले होते.

यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष खैरे म्हणाले की, “मला भाषणांपेक्षा संवाद अधिक महत्त्वाचा वाटतो. पक्षाच्या वाटचालीमध्ये काही काळ खंड पडला होता. मात्र आता थांबलेले काम अधिक वेगाने पुढे नेण्याचा निर्धार आम्ही केला आहे. येत्या आठ दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक हालचाल दिसून येईल असे त्यांनी म्हटले. तसेच पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. अनेक कार्यकर्ते कोणत्याही अपेक्षेशिवाय पक्षासाठी झटत असतात. अशा प्रत्येक कार्यकर्त्याचा आवाज वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचविणारा दुवा म्हणून मी काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच मी शब्द देतो, पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याच्या भावना आणि अपेक्षा वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीन. कार्यकर्त्यांनी कोणत्याही वेळी संपर्क साधला तरी त्यांच्या मदतीसाठी उपलब्ध राहीन असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार आणि धोरणे अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार पार्थ पवार यांच्या विचारांना समोर ठेवून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व आमदार, पदाधिकारी आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांशी व्यापक चर्चा करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नियोजनबद्ध दौरे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आठवड्यातील एक दिवस राष्ट्रवादी भवन येथे ‘जनता दरबार’ भरवून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

आगामी विधानसभा निवडणुकांबाबत आत्मविश्वास व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “नाशिक जिल्ह्यातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला क्रमांक एकचा पक्ष बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे. पुढील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून दहा आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवून संघटनात्मक तयारी करण्यात येईल. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर दौरे करून सर्व सेल, विभाग आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संघटनात्मक शिस्तीबाबत स्पष्ट भूमिका मांडताना खैरे म्हणाले, “पक्षात सक्रियपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय आणि सन्मान दिला जाईल. मात्र पक्षासाठी काम न करणाऱ्यांना संघटनेत स्थान राहणार नाही. प्रत्येक पदाधिकारी हा पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्याची भावना निर्माण करून जबाबदारीची जाणीव वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण “सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. आपण सर्वांनी साथ दिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जिल्ह्यात अधिक सक्षम आणि प्रभावी बनवू. चला, सर्वजण मिळून जोमाने कामाला लागूया असे आवाहन त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.

यावेळी जेष्ठ नेते नाना महाले, सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, कविताताई कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, प्रदेश पदाधिकारी प्रसाद सोनवणे, डॉ. योगेश गोसावी, युवती अध्यक्ष पूजा आहेर, आकाश पगार, मोहन शेलार, ज्ञानेश्वर दराडे, संजय खैरणार, विद्यार्थी अध्यक्ष राहुल कदम, अल्पसंख्यांक अध्यक्ष सोहेल मोमीन, संकेत निमसे, भारत जाधव, यशवंत शिरसाठ, येवला तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, बागलाण तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रघुनाथ आहेर , चांदवड तालुकाध्यक्ष, देवळा तालुकाध्यक्ष कैलास देवरे, सुरगाणा तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, कळवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पेठ तालुकाध्यक्ष रामदास गवळी, नांदगाव तालुकाध्यक्ष, मालेगाव तालुकाध्यक्ष किशोर इंगळे, दिंडोरी तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, निफाड पूर्व अध्यक्ष भाऊसाहेब भवर, येवला शहराध्यक्ष साहेबराव मढवई, चांदवड शहराध्यक्ष गोकुळ देवरे, निफाड शहराध्यक्ष तनवीर राजे, तनवीर राजे, भारत खैरनार, अजय खांडबहाले, निर्मला सावंत, योगिता पाटील, संगीता राऊत, सायरा शेख, शैला दळवी, सुनीता गुबडे, अंजली वाघले, शिवली जाधव, हिरामण जाधव, निवृत्ती सापटे, गोकुळ बत्तासे, शरद पगार आदि. पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या साडेपाच हजार विशेष बसेसचे नियोजन – परिवहन मंत्री...

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbai पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी यंदाही सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे...