Friday, April 3, 2026
Homeमुख्य बातम्याNashik NCP Politics : राष्ट्रवादीत गटनेतापदावर 'या' नगरसेविकेने दावा सांगितला पण...

Nashik NCP Politics : राष्ट्रवादीत गटनेतापदावर ‘या’ नगरसेविकेने दावा सांगितला पण त्याआधीच…; पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली, नेमकं काय घडलं?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेतील (Nashik NMC) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात गटनेतापदावरून तीव्र अंतर्गत वाद उफाळून आला आहे. माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील (Dr.Hemlata Patil) यांनी गटनेतापदावर दावा केलेला असतानाच पक्षाकडून सीमा रंजन ठाकरे यांच्या नावाचे नियुक्तीपत्र आल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२) झालेल्या गटनोंदणी प्रक्रियेला डॉ. पाटील गैरहजर राहिल्या. त्यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीने अधिकृत गटनिर्मिती करत सीमा ठाकरे यांची गटनेता म्हणून नोंद केली.

- Advertisement -

पक्ष कार्यालयात दोन दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर डॉ. पाटील नाराज होऊन बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांनी राष्ट्रवादीसोबत (NCP) गटनोंदणी केल्याने पक्षाचे महापालिकेतील संख्याबळ वाढले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे एकूण चार नगरसेवक असून, डॉ. हेमलता पाटील वगळता उर्वरित सर्व नगरसेवक नवोदित आहेत. ज्येष्ठत्वाच्या आधारे डॉ. पाटील यांनी गटनेतापदाचा दावा केला होता.

हे देखील वाचा : Nashik MC Politics : महापौरपदाचा उमेदवार आज ठरणार! महाजनांनी बोलावली नगरसेवकांची बैठक, कुणाला मिळणार संधी?

डॉ. पाटील यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, २४ जानेवारी रोजी त्यांनी उप मुख्यमंत्री (कै.) अजित पवार यांची भेट घेतली होती. त्या वेळी महापालिकेतील संख्याबळ, गटनिर्मिती आणि नेतृत्वाबाबत सविस्तर चर्चा झाली होती. ‘तुमची ही सहावी टर्म असल्याने तुम्हालाच गटनेता म्हणून काम करावे लागेल,’ असे पवार यांनी स्पष्टपणे सांगितल्याचा दावा डॉ. पाटील यांनी केला आहे. मात्र, त्यांच्या निधनानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या स्वाक्षरीचे पत्र सीमा ठाकरे यांच्या नावाने आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. या पत्राबाबत आपण कोणतीही संमती दिलेली नसून, प्रदेशाध्यक्षांकडून अद्याप स्पष्टता मिळालेली नाही, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. जोपर्यंत या प्रकरणावर अधिकृत स्पष्टीकरण येत नाही, तोपर्यंत आपण कोणत्याही गटात सहभागी होणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

दरम्यान, ‘वैयक्तिक कारणांमुळे डॉ. हेमलता पाटील गटनोंदणीला उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांना केव्हाही गटात सहभागी होता येईल,’ असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे (Ranjan Thackeray) यांनी दिले आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून, आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील वाचा : Nashik Mayor : भाजपकडून महापौर, उपमहापौर पदासाठी नावे निश्चित झालेल्या आडके आणि सानप आहेत राजकीय वारसदार

मी सही केलेली नाही

प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याशी फोनवर चर्चा झाली असता, त्यांनी असे कोणतेही पत्र दिले नसल्याचे सांगितले आणि संभ्रम झाल्याचे नमूद केले. अजितदादा पवार यांच्या कार्यालयातून अशा प्रकारची पत्रे कधीही जात नव्हती.प्रदेशाध्यक्षांकडून या प्रकरणावर स्पष्टता येईपर्यंत आपण कोणत्याही गटात सहभागी होणार नाही. मी कोणत्याही दबावाला बळी न पडता लोकांसाठी काम करत राहीन. हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल.

डॉ. हेमलता पाटील, नगरसेविका

हे देखील वाचा : Nashik MC Politics : महापालिका सत्ता संघर्षात नवा ट्विस्ट; शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी नेले महापौर पदासाठी अर्ज

ताज्या बातम्या

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवार 4 एप्रिल 2026 रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते महाराजस्व अभियानास उपस्थित असून...