दिंडोरी | Dindori
दिंडोरी व सिन्नर (Dindori and Sinnar) येथील भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP SP) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पक्षाने कायमस्वरूपी हकालपट्टी केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील (Dattatray Patil) यांनी दिली.
स्वतःच्या फायद्यासाठी सतत पक्षांतर करणारे तसेच पक्षाशी, जनतेशी व मतदारांशी प्रतारणा करणाऱ्या सिन्नर विधानसभेची उमेदवारी करणारे उदय सांगळे (Uday Sangle) व दिंडोरी-पेठ विधानसभेची उमेदवारी केलेल्या सुनीता चारोस्कर (Sunita Charoskar) यांची पक्षशिस्त मोडल्याबद्दल हकालपट्टी करण्यात आल्याचे पाटील यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.
तसेच सिन्नर (Sinnar) तालुकाध्यक्ष संजय सोनवणे,शीतल सांगळे, दिंडोरी तालुकाध्यक्ष राजू ढगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शाम हिरे यांनीही विविध पदांवर असताना पक्षाशी व कार्यकर्त्यांशी प्रतारणा केल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.




