नाशिक | मनोज निकम | Nashik
शहरासह पंचवटी परिसर (Panchvati Area) धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध असून, पंचवटी, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) यांसारख्या ठिकाणी दररोज शिवभक्तांची मोठी गर्दी असते. मात्र, शहरातीलच एक महत्त्वाचे आणि अल्पपरिचित ठिकाण अनेक नाशिककरांच्या (Nashik) नजरेआड आहे. निमाणी परिसरातील आदित्य कुंज परिसरात राजराजेश्वरनगर येथे तब्बल १२ फूट उंच शिवलिंग आहे, ज्याची माहिती शहरातील अनेकांना नाही.
विशेष काय?
महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वात मोठे शिवलिंग आहे. शिवलिंग आपल्या भव्यतेमुळे वेगळे ठरते, नाशिकमध्ये अनेक शिवमंदिरे असली तरी, एवढ्या मोठ्या आकाराचे शिवलिंग दुर्मीळ आहे. हे शिवलिंग गेल्या काही वर्षांत स्थापन करण्यात आले असून, स्थानिक मक्त आणि काही शिवभक्तांच्या माध्यमातून याची पूजा अर्चा केली जाते.
भाविकांमध्ये उत्सुकता
हे धार्मिक स्थळ स्थानिक पातळीवर परिचित असले तरी, संपूर्ण नाशिकमध्ये बाबद्दल फारशी माहिती नाही. त्र्यंबकेश्वर किवा गंगाघाटाप्रमाणे प्रसिद्धी नसल्यामुळे हे स्थान अजूनही भाविकांच्या मुख्य बात्रामार्गात समाविष्ट झालेले नाही.
धार्मिक महत्त्व अन् भक्तांची श्रद्धा
शिवलिंग हे शिवशक्तीचे प्रतीक मानले जाते आणि भक्तगण येथे नियमितरित्या दर्शनासाठी येतात. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे विशेष पूजा आणि अभिषेक आयोजित केला जातो.
स्थानिकांची मागणी
नाशिक महानगरपालिका तसेच पर्यटन विभागाने या स्थळाची योग्य प्रसिद्धी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत हे. शहरातील भाविक आणि पर्यटकांनीही या ठिकाणी भेट द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अनोख्या धार्मिक स्थळांपैकी एक
राजराजेश्वरनगरमधील हे १२ फूट उंच शिवलिंग नाशिककरांसाठी एक अभिमानास्पद धार्मिक स्थळ असून, भाविकांनी येथे दर्शनासाठी जावे आणि या स्थानाचा अधिक प्रसार व्हावा, अशी भावना स्थानिक व्यक्त करत आहेत.
२१ फुटी त्रिशूळ
सद्गुरू ग्रुपतर्फे उभारलेल्या या भव्य मंदिरात राज्यातील पहिल्याच बारा फुटी नर्मदेश्वर महादेवाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शिवलिंगाचे बजनही बरा टन असल्याने हे मंदिर चारा ज्योतिर्लिंग स्वरूप असल्याचे विश्वस्त मंडळाने सांगितले. मंदिराची उंची पन्नास फूट असून याचे काम नव्वद दिवसांत पूर्ण करण्यात आले होते.