Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : अंगावर वीज पडून २४ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू

Nashik News : अंगावर वीज पडून २४ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू

घोटी | वार्ताहर | Ghoti  
इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) उंबरकोन (Umberkon) येथे रविवारी सायंकाळी आलेल्या अवकाळी पावसामुळे वीज (lightning) पडून २४ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुजा त्र्यंबक भांगरे असे मृत्यू झालेल्या युवतीचे (Woman) नाव आहे. पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने घराजवळच्या शेतावर पुजा काम करत असताना सायंकाळी सहाच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Rain) सुरु झाला. यावेळी पुजा ही अंगणात वाळत घातलेल्या पापड्या व कुरडया काढत असताना तिच्या अंगावर अचानक वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती तिचे वडील त्र्यंबक भांगरे यांनी घोटी पोलीस ठाण्यास (Ghoti Police Station) माहिती कळविली असता पोलीसांनी (Police) घटनास्थळी धाव घेऊन तिला घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या