Friday, September 25, 2026
HomeनाशिकNashik News : अंगावर वीज पडून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू

Nashik News : अंगावर वीज पडून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

तालुक्यातील हरसूल भागातील (Harsul Area) भागओहळ येथे पावसाच्या पहिल्याच दिवशी अंगावर वीज (lightning) पडून २५ वर्षीय युवक (Youth) ठार झाल्याची घटना काल (शनिवार दि.१४) रोजी घडली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, जगदीश सिताराम लहारे (वय २५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात शनिवारी दुपारी विजांच्या आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस (Rain) झाला. यावेळी वीज अंगावर पडून लहारे याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती तहसीलदार श्वेता संचेती (Shweta Sancheti) यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ नायब तहसीलदार पवार यांना घटनेची नोंद घेण्यास सांगितले. तसेच या प्रकरणाची संबंधित पोलीस ठाण्याला (Police Station) देखील माहिती देण्यात आली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे गणित गुंतागुंतीचे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय गणिते पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. दरम्यान,...