Friday, October 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik ZP News : स्वातंत्र्यदिनी प्रतीक्षा यादीतील ४५ उमेदवारांना मिळणार नियुक्ती आदेश

Nashik ZP News : स्वातंत्र्यदिनी प्रतीक्षा यादीतील ४५ उमेदवारांना मिळणार नियुक्ती आदेश

नाशिक | Nashik

जिल्हा परिषद नाशिकतर्फे (Nashik Zilla Parishad) गट ‘क’ भरती प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या उमेदवारांचा सन्मान स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) निमित्ताने विशेष पद्धतीने करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत (दि.१५) रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचे वितरण होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी दिली.

- Advertisement -

सन २०२३ च्या भरती प्रक्रियेत जिल्हा परिषद नाशिकच्या विविध विभागांमध्ये गट ‘क’ श्रेणीतील विविध पदांसाठी (Posts) नियुक्ती देण्यात आल्या. प्राथमिक निवड यादी जाहीर झाल्यानंतर उर्वरित पात्र उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली होती. शासनाच्या नियमांनुसार, रिक्त जागा उपलब्ध झाल्यास या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना प्राधान्याने संधी देण्याची तरतूद आहे.

त्यानुसार, आता उपलब्ध झालेल्या जागांसाठी प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांची (Candidate) निवड करण्यात येणार आहे. यात कनिष्ठ सहायक (लिपिक) ५, कनिष्ठ अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) १, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १, ग्रामपंचायत अधिकारी २, आरोग्य सेवक (५० टक्के) २७ आणि आरोग्य सेवक (४० टक्के) ९ व अशा एकूण ४५ उमेदवारांना नियुक्ती आदेश (Order) देण्यात येणार आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषद नाशिकने यापूर्वीही भरती प्रक्रियेत पारदर्शकता, वेळेत पूर्णता आणि पात्र उमेदवारांना संधी देण्याच्या बाबतीत आपला ठसा उमटवला आहे. त्यानतंर आता स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण असल्याने, जिल्हा परिषद भरतीतील प्रतीक्षा यादी (Waiting List) मधील उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरणही या दिवशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (Omkar Pawar) यांनी घेतला आहे.

ताज्या बातम्या

देवेंद्र

CM Devendra Fadnavis: जरांगेंच्या ऑडिओ क्लिप बॉम्बवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली...

0
मुंबई | Mumbaiमराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी कथित ऑडिओ क्लिप सार्वजनिक केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये ५०० कोटी रुपयांच्या...