Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : सोयाबीन, कापूस अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जिल्ह्याला ५० कोटींचा निधी

Nashik News : सोयाबीन, कापूस अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जिल्ह्याला ५० कोटींचा निधी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मागील वर्षी पाण्याची टंचाई असल्यामुळे याचा परिणाम यंदाच्या हंगामात सोयाबीन व कापूस (Soybeans and Cotton) पिकावर मोठ्या प्रमाणात झालेला दिसून आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) आर्थिक सहाय्य मदत म्हणून सोयाबीन कापूस अर्थसहाय्य योजना महारष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्याना हेक्टरी ५ हजार तर एका शेतकऱ्याला २ हेक्टरपर्यंत म्हणजेच प्रती शेतकरी १० हजार रुपये आर्थिक मदत ई पीक पाहणी मार्फत या योजनेद्वारे केलेल्या नोंदणीप्रमाणे दिली जाणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Bribe News : दहा हजारांची लाच घेतांना तलाठ्यास रंगेहाथ पकडले

YouTube video player

या योजनेसाठी कृषी विभागामार्फत (Department of Agriculture) आतापर्यंत २ लाख २९ हजार लाभार्थ्यांची नोंदणी अपेक्षित असून यामध्ये वैयक्तिक १ लाख ७० हजार उर्वरित सामयिक खातेदारांपर्यंत (Account Holders) या योजनेचा लाभ होणार आहे. नाशिक विभागासाठी ४० ते ५० कोटी पर्यंत निधी वितरित होणार असल्याचे कृषी अधिकारी शिवाजी आमले यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची दमदार हजेरी; नागरिकांची तारांबळ

दरम्यान, या योजनेसाठी नाशिक जिल्ह्यात (Nashik District) आतापर्यंत १ लाख ५० हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. यामधे अजूनही ४२ हजार शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसल्यामुळे प्रलंबित आहे. यामुळे शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहाय्यक कार्यालयात किंवा सेतू कार्यालयात केवायसी (KYC) करण्यासाठी कृषी विभागामार्फत आवाहन केले जात आहे.

हे देखील वाचा :  Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे विधानसभेसाठी इच्छुकांची तोबा गर्दी; कुणाची लागणार लॉटरी?

जिल्ह्यात योजनेचा लाभ घेण्यासाठी इतकी नोंदणी

वैयक्तिक खातेदार

जिल्ह्यात कापूस पिकासाठी वैयक्तिक खातेदार ३६ हजार ८९० खातेदार आहे.यापैकी नोंदणी पूर्ण ३१ हजार १६५ खातेदार आहेत. तर सोयाबीन पिकाचे १ लाख २५ हजार वैयक्तिक खातेदार असून १ लाख ९ हजार खातेदारांच्या नोंदणी पूर्ण झाल्या आहेत.

सामुदायिक खातेदार

कापूस पिकासाठी ९ हजार ४०० सामुदायिक खातेदार असून यामधे १ हजार ४०० नोंदणी पूर्ण झाल्या आहेत. तर सोयाबीन पिकासाठी ५७ हजार खातेदार असून ६ हजार २०० नोंदणी पूर्ण झाली आहे.यामध्ये नोंदणी कमी होण्याचे कारण सातबारा उताऱ्यावर जास्त नाव असल्यामुळे या नोंदणीला वेळ लागत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Sinnar : तुतारीला निवडून आणण्याची जबाबदारी खा.वाजेंची- आ.जयंत पाटील

खातेदारांची नोंदणी होण्यासाठी कृषी विभागातर्फे गावोगावी कॅम्प

उर्वरित नोंदणीचे खातेदार काही मयत आहेत, तर काही बाहेरच्या गावी असल्यामुळे संपर्कात येत नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच उर्वरित केवायसी खातेदारांची नोंदणी होण्यासाठी कृषी विभागातर्फे गावोगावी कॅम्प आयोजित केले जात आहे.

या योजनेचा पहिला हप्ता २९ सप्टेंबर रोजी जमा होण्याचा अंदाज असून शेतकऱ्यांनी आर्थिक मदत मिळण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करावी.

शिवाजी आमले, जिल्हा कृषी अधिकारी नाशिक

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

ठाकरे

“तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल, कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?”;...

0
मुंबई | Mumbaiराज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचार जोरात सुरू आहे. प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. विविध पध्दतीही राबवल्या...