Wednesday, May 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : …अन् 'त्या' खड्ड्यात सापडल्या ६० देशी दारूच्या बाटल्या; पोलिसांनी...

Nashik News : …अन् ‘त्या’ खड्ड्यात सापडल्या ६० देशी दारूच्या बाटल्या; पोलिसांनी केली कारवाई

वणी | वार्ताहर | Vani

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) कोल्हेर (Kolher) येथे देव घराच्या खाली खड्डा खोदून लपविलेल्या देशी दारूच्या बाटल्या वणी पोलि‍सांनी (Vani Police) शोधून काढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या (Police) या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हेर येथे दारू (liquor) विक्री केली जात असल्याची तक्रार स्थानिकांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली होती. त्याअनुषंगाने नुकतीच नेमणूक झालेल्या वणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोल्हेर येथील साहेबराव रामदास पिठे (वय ४८ रा. कोल्हेर, ता.दिंडोरी) यांच्या राहत्या घराची झडती घेतली.

दरम्यान, यावेळी पिठे यांनी देवघराच्या खाली खोदलेल्या खड्ड्यात प्रिन्स संत्राच्या देशी दारूच्या ६० सीलबंद बाटल्या ज्याची किंमत ४ हजार ८०० रुपये या आढळून आल्या. सपोनि गायत्री जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तर वणी पोलिसांनी पिठे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : तरुणाचे अपहरण करून बंदिस्त ठेवत अमानुष मारहाण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या रागातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला बंदिस्त ठेवत अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. या...