Saturday, April 26, 2025
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ८०० पार; ४३ रूग्ण करोनामुक्त, ४ नव्या रूग्णांची...

नाशिक जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ८०० पार; ४३ रूग्ण करोनामुक्त, ४ नव्या रूग्णांची भर

नाशिक । प्रतिनिधी

आज दिवसभरात जिल्ह्यात केवळ 4 नव्याने पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली यामुळे जिल्ह्याचा करोनाग्रस्तांचा आकडा 800 पार गेला आहे. तर आज सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील 43 रूग्ण करोना मुक्त झाल्याने करोना मुक्त होणार्‍या रूग्णांची संख्या 591 वर गेली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनास दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात मालेगाव, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही करोनाचा प्रसार वेगाने वाढला असून आज शहरातील नाशिकरोडसह निफाडच्या उगाव परिरात प्रत्येकी 1 रूग्ण आढळले आहेत. कालपर्यंत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील विविध नव्या गावांमध्ये तसेच शहराच्या विवधि नगरांमध्ये करोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत.

अशातच आता निफाड तालुक्यातील उगावची भर पडली आहे. आज दिवसभरात 100 अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले. यामध्ये 93 निगेटिव्ह आले. 4 पॉझिटिव्ह आले, 2 दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह आले तर 1 रद्द करण्यात आला. मालेगावची करोना बाधीतांची संख्या वेगाने वाढत असून यात आज 2 जणांची भर पडली. यामुळे मालेगावचा आकडा 619 वर पोहचला आहे. तर जिल्ह्याचा आकडा 800 वर गेला आहे. यात नाशिक शहरातील 47, जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील 104 व जिल्ह्याबाहेरील 30 रूग्णांचा सामावेश आहे.

एकिकडे करोना रूग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी होत असतानाच जिल्ह्यात करोना मुक्त होणार्‍या रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 43 रूग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून मुक्त करण्यात आले आहे. यामुळे करोना मुक्त होणार्‍या रूग्णांचा आकडा 591 वर पोहचला आहे. यात सर्वाधिक करोना मुक्त 469 मालेगावचे आहेत. यामुळे उरलेल्या करोनाग्रस्तांचा आकडा 209 राहिला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत 39 हजार 665 संशयित रूग्णांचे स्क्रीनींग करण्यात आले आहे. जिल्ह्यातून आजपर्यंत 7 हजार 559 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 6 हजार 416 निगेटिव्ह, 800 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 137 रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 343 अहवाल प्रलबिंत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित: 800
* मालेगाव : 619
* नाशिक : 47
* उर्वरित जिल्हा : 104
* एकूण मृत्यू: 42
* कोरोनमुक्त : 591

करोना मुक्त रूग्ण असे

* मालेगाव : 469
* नाशिक : 32
* उर्वरित जिल्हा : 62
* जिल्हा बाह्य : 28
* एकुण कोरोनमुक्त : 591

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...