Wednesday, May 6, 2026
Homeमुख्य बातम्याNashik News : ऑनलाइन तक्रारींचा पोलिसांकडून निपटारा; ८९२ अर्जावर निर्णय, 'आपले सरकार'वर...

Nashik News : ऑनलाइन तक्रारींचा पोलिसांकडून निपटारा; ८९२ अर्जावर निर्णय, ‘आपले सरकार’वर अधिक नोंदी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जानेवारी महिन्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सर्वच विभागांसाठी राबविलेल्या शंभर दिवस कृती आराखड्यात नाशिक पोलीस आयुक्तालयातील (Nashik Police Commissionerate) तेरा पोलीस ठाण्यांशी निगडीत ८९२ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. आयुक्तालयाने विभागनिहाय वर्गवारी करुन आहेत. या तक्रारींवर कार्यवाही करीत तक्रारदारांचे समाधान केले आहे. विशेष म्हणजे नाशिककरांनी आपल्या नानाविध समस्या, तक्रारी चार वेगवेगळ्या तक्रार निवारण विभागाकडे नोंदवल्या होत्या.

- Advertisement -

त्यातील आपले सरकार पोर्टल (Aaple Sarkar Portal) व सीपी व्हॉट्सॲप नंबरवर सर्वाधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या शहरात नागरिकस्नेही पोलिसिंगवर भर देण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून सोशल मीडियाचा वापर सुरु आहे. नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्या, त्रास किंवा गुन्हे-गुन्हेगारांविषयी तक्रारी असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी ९९२३३२३३११ हा ङ्गसीपी व्हॉट्सअपफ क्रमांक सुरू आहे. नागरिकांकडून जास्तीत जास्त माहिती मिळावी व नागरिकांसोबत थेट संवाद राहावा म्हणून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिककेंद्रित पोलिसिंगवर भर दिला आहे.

त्यानुसार नागरिकांनी (Citizen) केलेल्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देऊन काही प्रकरणात केलेल्या कारवाईची माहिती विविध सोशल मिडियातून झळकवली जाते. नाशिककरांनी (Nashik) जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत वाहतूक, सिग्नल, अवैध व्यवसाय, छेडछाड, हाणामारी, मदत, विनयभंग, तक्रार अर्जावर झालेली कार्यवाही, कार्यकारी व अकार्यकारी स्वरुपाच्या तसेच मद्य व गुटखा विक्री आणि अन्य स्वरुपाच्या तक्रारी ऑनलाईन (Online) पद्धतीने नोंदवल्या होत्या. त्यावर आयुक्तालयातील व पोलीस ठाण्याच्या विविध आस्थापनांनी त्वरित कारवाई करुन निराकरण केले आहे.

ऑफलाईन तक्रारींवरही भर

आयुक्तालयासह पोलिसांशी निगडीत अनेक विषय, समस्या व तक्ररी नोंदवण्यासाठी नागरिक व पीडित ऑनलाईन सेवेवर भर देत आहेत. अल्पशिक्षित वा गोरगरीब नागरिक कागदावर अर्ज लिहून संबंधित पोलीस ठाणे व चौकीत दाखल करीत आहेत. अर्ज घेतल्यानंतर त्या अर्जावर तत्त्काळ कारवाई होत नसल्याचा अनुभव अनेक तक्रारदारांनी बोलून दाखवला.

ताज्या बातम्या

पंचवटीतील श्री काळाराम मंदिरावर फडकला धर्मध्वज

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ च्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज धर्मध्वज उभारणी सोहळा पार पडला. अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या...