Thursday, July 30, 2026
HomeनाशिकNashik News : बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांसह वासरू ठार

Nashik News : बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांसह वासरू ठार

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दहिवड | वार्ताहर | Dahiwad

देवळा तालुक्यातील (Deola Taluka) दहिवड भौरी शिवारात शेतात खळ्यातील जाळीत बंदिस्त शेळ्यांवर बिबट्याने (Leopard) हल्ला केल्याची घटना घडली असून त्यात दोन शेळ्या आणि एक वासरू जागीच ठार झाले आहे, तर एक बोकड घेऊन बिबट्याने पलायन केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिबट्याची दहशत राहिली असून या घटनेचा वनविभागाने पंचनामा केला आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दहिवड (ता.देवळा) येथील भाऊसाहेब खंडू सोनवणे या शेतकऱ्याच्या भौरी शिवारात (Shivar) रस्त्यालगत शेतातील गट नंबर ६६/३ घराशेजारी असलेल्या खळ्यात शेळ्या जाळीच्या आत बांधलेल्या होत्या. पहाटे बाहेर आवाज आल्याने सदर शेतकरी भाऊसाहेब सोनवणे यांना जाग आली असता ते बाहेर आल्यावर त्यांना जाळीच्या आतून शेळ्यांचा फडशा पडलेला दिसून आला. तर बाजूच्या शेतात वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे उमटल्याने. हा हल्ला बिबट्यानेच केल्याची खात्री झाली आहे.

यानंतर वनअधिकारी देविदास चौधरी व जी.जी.पवार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी करत सदर घटनेचा सविस्तरपणे पंचनामा केला.या शिवारात मोठ्या प्रमाणात लोक शेतात वास्तव्यास असून रात्री-पहाटे शेतकामांसाठी बाहेर पडावे लागते. तसेच या शिवारात बिबट्याने पशुधनावर हल्ले सुरू केल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी भौरी शिवारातील शेतकरी (Farmer) भाऊसाहेब सोनवणे, दिलीप सोनवणे,शिवाजी सोंनजे, देविदास सोनवणे,शांताराम निकम, रघुनाथ सोनवणे, नामदेव सोनवणे, मुरली सोनवणे, निंबा सोनवणे, आबा सोनवणे, राजू सोनवणे यांच्यासह आदींनी केली आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : बँक संचालकांची कालमर्यादा, वास्तव काय?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक केंद्र सरकारमध्ये सहकार या विषयासाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती झाल्यानंतर बरेच बदल झाले आहेत. मुख्य म्हणजे बँकिंग...