Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : मुख्यमंत्र्यांच्या दालनात आज सिंहस्थ बैठक; आराखड्याचे सादरीकरण

Nashik News : मुख्यमंत्र्यांच्या दालनात आज सिंहस्थ बैठक; आराखड्याचे सादरीकरण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर प्रयागराज दीन्यांनंतर नव्याने तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण (Presented) आज बुधवारी (दि.२६) सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांच्या (CM) बैठकीत सादर केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वांच्या समवेत झालेल्या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधान्याने करावयाच्या कामांचा आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार प्रयागराज येथील कामांची प्रत्यक्ष पहाणी केल्यानंतर प्राधान्यक्रमाने नव्या आराखड्यात समाविष्ट केले आहेत. दुरुस्तीनंतर आज मुख्यमंत्र्यांच्या दालनात याचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.

- Advertisement -

सन २०२६-२७मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर (Nashik and Trimbakeshwar) येथे आयोजित होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. २६) मुंबईत सहाद्री अतिथीगृह येथे शिखर समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व यंत्रणांशी बैठक घेत आढावा घेतला. तसेच, मुख्यमंत्र्यांसमोर सादर करावयाच्या प्रकल्पाबाबत माहिती घेतली. साधुग्राम, रस्ते, स्वच्छता, रिंगरोड, नदीघाटांची निर्मिती व डागडूजी, रामकुंड व कुशावर्त तीर्थाचे शुद्धीकरण, गोदावरी प्रदूषणमुक्त करणे, पुलांची उभारणी अशा विविध बाबीवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय समितीने (District Level Committee) विविध यंत्रणांशी संपर्क साधत कामांचा प्राधान्यक्रम ठरविला आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय समितीने कुस्ती करून नव्याने हा आराखडा शिखर समितीकडे सादर केला आहे. १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या मा तातडीच्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

आढावा बैठकीपूर्वी मनपा अधिकारी मैदानात; साधुग्राम उभारणीसह रस्त्यांच्या कामांवर विशेष भर

आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या तयारीच्या अनुषंगाने आज (दि. २६) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत आढावा घेणार असून, त्यापूर्वीच आज दुबरनंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्यासह बरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिंहस्थ भरण्याच्या परिसरात प्रत्यक्ष जाऊन आढावा घेतला. यावेळी गर्दी निकक्षण, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक सुलभीकरण, साधुग्राम उभारणी व रस्त्यांचे सुधारकाम यावर विशेष भर देण्यात आले. तसेच साधुग्रामच्या कामाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी यंत्रणेला दिला. प्रयागराज कुंभमेळ्यातील अनुभव लक्षात घेऊन साधुग्राम व इतर उपयोगासाठी किती एकर जागा होऊ शकेल, याचा अंदाज व अधिग्रहण प्रक्रियेचा आढावा महापालिका आयुक्तांनी मंगळवारी (दि.२५) रोजी घेतला. यासाठी नगरविकास विभागाला प्राधान्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, यावेळी मखमलाबाद परिसरातील रस्ता जोडणीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या अधिग्रहणाच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना प्रक्रियेची गती वाढवण्याचे निर्देश दिले. गंगापूर रोडकडे जाणाऱ्या पर्यायी मागांसाठी जमिनीच्या अधिग्रहणाचे कामाचे अडथळ्यांचे निवारण करण्याचे आदेश देण्यात आले. गंगापूर रोडकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाच्या संभाव्य रेषेची पाहणी करण्यात आली. जलद काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या, रासबिहारी स्कूल ते आरटीओ व कॅन्सर हॉस्पिटल ते मखमलाबाद रस्ता वाहतूक सुरळीत करण्यासाठी मीसिंग लिंक जागांची पाहणी करत त्याच्या ताब्यासाठी तत्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता अविनाश धनखंत, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...