Friday, October 2, 2026
HomeनाशिकTribal Student Long March : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फुट; एक गट लाँगमार्च...

Tribal Student Long March : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फुट; एक गट लाँगमार्च मधून बाहेर

नाशिक | Nashik

आश्रमशाळा विद्यार्थ्यांचे (Tribal Student) प्रलंबित प्रश्न आणि आदिवासी मंत्र्यांसह मुख्य सचिव व आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी राजभवनाच्या दिशेने जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या भेटीनंतर उभी फूट पडली आहे. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांच्यापुढे मागण्या मांडल्या. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाच्या मूलभूत मागण्या कालबद्ध वेळेत सोडविल्या जातील, असे आश्वासन शिष्टमंडळला (Delegation) दिले.

- Advertisement -

मात्र, मुख्यमंत्र्यानी दिलेल्या आश्वासनावर एका गटाचे समाधान न झाल्याने सुमारे ६० ते ७० आंदोलकांनी राजभवनाच्या दिशेने जाण्याचा निर्णय कायम ठेवला असून, दुसर्‍या एका गटाने आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उभी फूट पडली आहे. आश्रमशाळांची दुरावस्था, सातत्याने विद्यार्थ्यांचे होणारे मृत्यू, सेंटर किचन बंद करावे, आदिवासी मंत्र्यांसह, सचिव व आदिवासी विकास आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोमवारी नाशिकमधून सकल आदिवासी समाजाचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला होता.

दरम्यान, आता आंदोलकांमध्ये (Protester) उभी फूट पडली आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला टप्याटप्याने मागण्या सोडविण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे नाशिकसह, धुळे, पालघर, संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांनी लाँगमार्च मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील ६० विद्यार्थ्यांनी लाँगमार्च कायम ठेवला आहे, असे विद्यार्थी आंदोलक सोनू गायकवाड यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

भीषण अपघात! अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर

0
मुंबई । Mumbai अहिल्यानगर-पाथर्डी या राष्ट्रीय महामार्गावर माळी बाभुळगाव शिवारात गुरुवारी सायंकाळी एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला. एका सुसाट अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत...