Friday, August 21, 2026
HomeनाशिकNashik News : नाशिककर तणावमुक्त होणार; हैदराबादच्या धर्तीवर साकारणार अत्याधुनिक ध्यान केंद्र

Nashik News : नाशिककर तणावमुक्त होणार; हैदराबादच्या धर्तीवर साकारणार अत्याधुनिक ध्यान केंद्र

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहराचा (Nashik City) झपाट्याने होणारा विस्तार आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवनात वाढलेला मानसिक ताण लक्षात घेऊन, शहरात एका अत्याधुनिक ध्यान केंद्राच्या उभारणीला महापौर हिमगौरी आहेर-आडके (Mayor Himgauri Aher-Adke) यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. हैदराबाद येथील शांतीवनच्या धर्तीवर हे केंद्र (Centre) साकारले जाणार असून, नमामि गोदा फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या या नाशिककरांच्या प्रस्तावामुळे मानसिक आरोग्याला आणि आध्यात्मिक साधनेला मोठी बळकटी मिळणार आहे.

- Advertisement -

शहरातील नोकरदारवर्ग, तरुण पिढी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे केंद्र पथदर्शक ठरेल, असा विश्वास केला महापौरांनी व्यक्त आहे. महानगरपालिका (Mahapalika) स्तरावर या प्रकल्पासाठी योग्य जागेची निवड करून कामाला तातडीने गती दिली जाणार आहे. या केंद्रामुळे नाशिककरांच्या धावपळीच्या आयुष्यात मानसिक शांतता आणि आध्यात्मिकतेचा समतोल साधण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अशा असतील सुविधा

  • अवाढव्य ध्यानधारणा हॉलः एकाच वेळी अनेक नागरिक शांततेत साधना करू शकतील असे साऊंडप्रूफ सभागृह.
  • योग आणि वेलनेस केंद्र नियमित योगासने, प्राणायाम आणि आरोग्य सत्रांसाठी स्वतंत्र जागा.
  • समुपदेशन कक्ष तज्ज्ञांमार्फत ताण-तणाव व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्यासाठी मार्गदर्शन.
  • मेडिटेशन गार्डन आणि वाचनालयः चालण्यासाठी ट्रॅक, पाण्याचे कारंजे असलेले निसर्गरम्य उद्यान आणि आध्यात्मिक साहित्याने समृद्ध अभ्यासिका.

नाशिकच्या सर्वांगीण विकासात नागरिकांचे मानसिक आरोग्य आणि अध्यात्मिक उन्नतीही तितकीच महत्त्वाची आहे. ध्यान केंद्रासारखा प्रकल्प शहरासाठी उपयुक्त ठरेल. प्रशासनाच्या माध्यमातून प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल.

हिमगौरी आहेर-आडके, महापौर

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मृत व बोटांचे ठसे न उमटणार्‍या साडेतीन हजार कर्जदारांना...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या यादीतील मृत शेतकरी खातेदारांच्या वारसांना लाभ दिला जाणार आहे. याबरोबरच कर्जमुक्तीचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत...