नाशिक | Nashik
चिचोंडी खुर्द (Chichondi Khurd) (ता. येवला) येथील कोमल साईनाथ मढवई (वय २०) हिचा आज गुरुवार (दि.२७) सकाळी आठ वाजेच्या दरम्यान शेततळ्यात बुडून (Drowning ) मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे.
शेतकरी (Farmer) कुटुंबातील साईनाथ मढवई हे शेतातच राहतात. त्यांच्या घराशेजारील असलेल्या शेततळ्यात वडिलांनी काम सांगितल्याने ती पाणी काढण्यास गेली असता शेततळ्यात पाय घसरून पडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी नागरिकांनी आरडाओरड करत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते प्रयत्न अपुरे पडले.
यानंतर चाळीस मिनिटांनी पारेगाव येथील पट्टीचा पोहणारा असलेला तरुणाने (Youth) पोहून शेततळ्यातील (Farm) तिचा मृतदेह (Dead Body) बाहेर काढला. यानंतर येथील पोलिस पाटील वनिता सोमनाथ मढवई यांनी सदर घटना पोलिसांना कळवली. येवला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर चिचोंडी खुर्द येथे तिच्यावर दुपारी तीन वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात (Yeola City Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार सचिन राऊत पुढील तपास करीत आहे. तसेच कोमलच्या मृत्यूची बातमी चिचोंडी परिसरात कळताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.