Friday, January 23, 2026
HomeनाशिकNashik Accident News : 'त्या' जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू; निळवंडी गावावर शोककळा

Nashik Accident News : ‘त्या’ जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू; निळवंडी गावावर शोककळा

दसर्‍याच्या दिवशी घडला होता अपघात

निळवंडी | वार्ताहर | Nilwandi

ओझरखेड शिवारात (Ozarkhed Shivar) सात दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात (Accident) एकाचा जागीच मृत्यू (Death) झाला होता, तर दोघे गंभीर जखमी झाले होते. नाशिक येथे उपचार सुरू असताना आता तिसर्‍या युवकाचाही मृत्यू झाल्याने निळवंडी गावावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

दसर्‍याच्या (Dasara) दिवशी सप्तश्रृंगीगड दर्शन करून दिंडोरीकडे परतताना निळवंडी येथील युवकांची दुचाकी ओझरखेड शिवारात पिकअप वाहनाला धडकली. या अपघातात अमोल भगवंत गवारी (२१) याचा जागीच मृत्यू झाला होता, तर अनिल सुखदेव गवारी आणि गोपी सुरेश गवारी हे दोघे गंभीर जखमी झाले होते.

YouTube video player

दरम्यान, जखमींना तातडीने नाशिक (Nashik) येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, तीन दिवसांपूर्वी गोपी सुरेश गवारी (२०) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणि आता अनिल सुखदेव गवारी (२५) याचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी अपघातात निळवंडी गावातील तीनही युवकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या

पासपोर्ट

Nashik News: परदेशगमन, शिक्षण, रोजगार, पर्यटनासाठी आठ वर्षात ‘एवढ्या’ नाशिककरांनी काढले...

0
नाशिक | प्रतिनिधीपरदेशगमन, शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी वाढलेल्या मागणीमुळे नाशिक शहरात पासपोर्टधारकांची (पारपत्र) संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या आठ वर्षांत (२०१८ ते २०२५) तब्बल...