Tuesday, April 22, 2025
HomeनाशिकNashik News: नाशिक बाह्यवळण रस्ते प्रकल्पाला गती द्या; मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव सादर करा...

Nashik News: नाशिक बाह्यवळण रस्ते प्रकल्पाला गती द्या; मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव सादर करा – मुख्यमंत्री फडणवीस

नाशिक | प्रतिनिधी
सन २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक परिसरात वाढणारी रहदारी, साधू, संत, महंत आणि भाविकांची होणारी गर्दी याचा विचार करुन योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिले. तसेच, नाशिक शहरात येणाऱ्या भाविकांना उत्तमोत्तम बाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मंत्रालयात आयोजित बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी काल नाशिक बाह्यवळण रस्त्याच्या कामांचा आढावा घेतला. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बाह्यवळण रस्त्यांतर्गत येणाऱ्या मार्गांची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश देऊन फडणवीस म्हणाले, नाशिक विभागीय आयुक्त आणि नाशिकचे पालक सचिव यांनी प्राधान्याने सुरु करावयाचा रस्त्यांचा आराखडा येत्या १० दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करावा. बाह्यवळण मार्ग, परिक्रमा मार्ग यांच्याबरोबरच अस्तित्वातील रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे तातडीने सुरु करावीत. विमानतळ, समृद्धी महामार्ग यांना जोडणाऱ्या मार्गांची कामे युद्धपातळीवर सुरु करा. तसेच शहरातील आवश्यक स्त्यांची कामे देखील महापालिकेमार्फत नगर नियोजन अंतर्गत घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

- Advertisement -

नाशिक बाह्यवळण मार्गातील १३७ किलोमीटरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ग्रीनफील्ड अलाईनमेंटद्वारे उभारण्यात येणार आहेत. जुन्या नाशिक-मुंबई महामार्गापासून पुढील ६९ किलोमीटरचा मार्ग हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणार आहे. यातील ४१ किलोमीटरचे रस्ते महापालिका हद्दीबाहेरून जातात. या रस्त्यांसाठी ४० गावांमधील ५०० हेक्टरचे भूसंपादन करावे लागणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

या बैठकीला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

साउथ सुपरस्टार महेश बाबूला ईडीने बजावले समन्स, काय आहे प्रकरण?

0
दिल्ली । Delhi साउथ सिनेमाचा सुपरस्टार महेश बाबू याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मनी लाँडरिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) ने त्याला समन्स बजावले आहे. या प्रकरणात...