नाशिक | भारत पगारे | Nashik
शहरात गेल्या अकरा महिन्यांत घडलेल्या विविध रस्ते अपघातांत (Accident) १६० जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांचे झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ११९ अपघात हे रात्री ८ ते मध्यरात्री १२ वाजेदरम्यान घडले आहेत. त्यामुळे शहरातील (City) रस्त्यांवरून रात्रीचा प्रवास धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे. या अपघातांमध्ये १५९ जणांचा मृत्यू झाला असून ४२२ जण जखमी झाल्याची नोंद पोलिसांकडे (Police) आहे. त्यामुळे शहरात चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर अखेरपर्यंत ४५८ अपघातांची नोंद झाली आहे.
वाहतूक नियमांचे (Traffic Rules) पालन न केल्याने अपघात होत असतात. त्यात वाहतूक नियमांचे वारंवार प्रबोधन करून किंवा दंडात्मक कारवाई करूनही चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने अपघात व अपघाती मृत्यूंचे प्रमाण दरवर्षी वाढते. चालू वर्षात शहरात ४५८ अपघातांची नोंद झाली आहे. त्यात १६० जणांचा अपघाती मृत्यू झाला असून २२० जण गंभीर जखमी झाले आहेत.
तर २०२ जण किरकोळ स्वरुपात जखमी (injured) झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे. तर सायंकाळी चार ते आठ यावेळेत ९९, दुपारी १२ ते चार या वेळेत ८६, सकाळी ८ ते १२ या वेळेत ८२, पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत ४१ आणि मध्यरात्री १२ ते चार या वेळेत सर्वात कमी ३१ अपघातांची नोंद आहे. त्याचप्रमाणे शहरात सर्वाधिक २७९ अपघात कॉलनी रस्त्यांवर झाले असून शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर १५१ अपघात आणि राज्य महामार्गांवर २८ अपघात झाले आहेत.
२४६ दुचाकीस्वार जखमी
मृत पादचारी- ४९ | जखमी – ८१ |
मृत सायकलस्वार -२ | ६ |
मृत रिक्षाचालक/प्रवासी – ३ | १५ |
मृत दुचाकीस्वार – ८९ | २४६ |
अपघातांची कारणे – अपघाती संख्या (कंसात मृत्यू
वाहनांचा वेग | १७९ (६८) |
धोकादायक वाहन चालवणे | १८८ (४८) |
विना हेल्मेट | ६३ (३६) |
मद्यपी चालक | १० (४) |
विरुद्ध दिशेने वाहन चालवणे | १२ (२ |
सिग्नल मोडणे | ०२ (१) |
इतर | ०४ (००) |