Monday, January 19, 2026
HomeनाशिकNashik News : दिंडोरी रोडवर मनपाची कारवाई; २२ टपरी धारकांनी स्वतःहून काढले...

Nashik News : दिंडोरी रोडवर मनपाची कारवाई; २२ टपरी धारकांनी स्वतःहून काढले अतिक्रमण

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

दिंडोरी रोडवरील (Dindori Road) रोडालगत असलेल्या जागेत येणाऱ्या टपरीधारकांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. दिंडोरी नाका परिसरातील एकूण ४३ टपरीधारकांची पाहणी करण्यात आली असून, त्यापैकी २२ टपऱ्या रोडालगत असलेल्या जागेत अतिक्रमणात असल्याचे निष्पन्न झाले. या २२ टपऱ्यांवर चिन्हरूपी खुणा करण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

उर्वरित २१ टपरीधारक रोडालगत असलेल्या जागेत येत नसल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. विशेष बाब म्हणजे, खुणा करण्यात आलेल्या २२ टपरीधारकांनी महापालिकेच्या (NMC) सूचनेनुसार स्वतःहून अतिक्रमण काढून घेतल्याची माहिती मनपा अतिक्रमण अधिकाऱ्यांनी दिली आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर

महानगरपालिका प्रशासनाकडून येत्या दोन दिवसांत रोडालगत असलेल्या जागेत येणाऱ्या उर्वरित टपऱ्या हटविण्यात येणार असून, नागरिक व टपरीधारकांनी मनपास सहकार्य करावे, अशी भूमिका मनपा आयुक्तांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, दिंडोरी नाका परिसरातील शॉपिंग सेंटरमधील ४३ गाळ्यांवरही खुणा करण्यात आल्या आहेत. गाळ्यांच्या सेंटरपर्यंतचा भाग कायम ठेवून पुढील बाजूस उभारण्यात आलेले शेड, तात्पुरती बांधकामे व सिमेंटचे ओटे काढून टाकण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित गाळेधारकांना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ही कारवाई मनपा आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी अतिक्रमण उपायुक्त नांदुरकर, पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, गाडी प्रमुख उमेश खैरे, नंदू खंडोर यांच्यासह पंचवटी विभागातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा : Malegaon MC Election Results : मालेगावात प्रभाग क्रमांक १ ते २१ मध्ये कोणता पक्ष ‘धुरंधर’; विजयी उमेदवारांची यादी वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

Malegaon MC Election : मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टी-एमआयएम-काँग्रेस युतीचा महापौर होणार?

0
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon शहराच्या विकासासाठी एमआयएम व काँग्रेसने सोबत येण्याचे आवाहन इस्लाम समाजवादी पार्टीतर्फे करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांगीण विकासाबरोबर जातीयवाद्यांपासून शहरास...