नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) घेण्याची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. मुंबई महापालिका वगळता राज्यातील इतर सर्व म हापालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी म हाविकास आघाडी सरकारच्या तीन सदस्यीय प्रभागरचना रद्द करून, महायुती सरकार (Mahayuti Government) पुन्हा चार सदस्यीय प्रभाग रचनेला पसंती देणार असल्याचे समजते. त्यामुळे नाशिक मनपा निवडणूक २०१७ प्रमाणे चार सदस्यी प्रभाग प्रभागप्रमाणे होण्याची शक्यता आहे.
शासनाने प्रभागरचनेबाबत मनपाला (NMC) लेखी आदेश दिलेले नसले तरी मनपा हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. करोनासह ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि प्रभाग रचनेचा वाद आदी कारणांमुळे राज्यातील २९ महापालिका, २४८ नगरपालिका, २६ जिल्हा परिषदांसह अन्य शेकडो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. सर्व कारभार प्रशासकांच्या हाती आहेत. यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये नाराजी आहे.
अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून येत्या चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) दिल्याने आता लवकरच निवडणूक होणार आहे. त्यानुसार नवीन प्रभाग रचना करण्यात येणार आहे. २०१७ मधील चार सदस्यीय प्रभाग रचना पुन्हा कायम ठेवायची की, २०२२ मधील नवीन तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक घ्यायची, याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक मनपा चार सदस्यी प्रभाग रचनेनुसार होणार आहे.
भाजपचे संघटन मजबूत असून बूथ स्तरावरून आमची रचना पूर्ण झाली आहे. नाशिक महापालिका निवडणूक कोणत्याही पद्धतीने झाली तरी आम्ही शंभर प्लस जागा जिंकून महापालिकेत सत्ता स्थापन करणार.
सुनील केदार, नाशिक शहराध्यक्ष, भाजप
प्रभागरचना एक सदस्यीय असो वा चार सदस्यीय; आमची तयारी पूर्ण झाली असून, प्रभागनिहाय बैठका सुरू झाल्या आहेत. नाशिक महापालिकावर पुढची सत्ता आमचीच राहणार.
डी. जी. सूर्यवंशी, नाशिक जिल्हाप्रमुख, शिवसेना (ठाकरे)




