नाशिक | प्रतिनिधी
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात विद्यार्थ्यांसह प्राध्यापक गंभीर जख्मी झाले आहेत. नियमित होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आज नाशिक राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस आणि कार्यकर्त्यांनी आज आंदोलन करत घटनेचा निषेध केला.
यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यकर्त्यांना नाशिक पोलिसांच्या शीघ्र कृती दलाच्या जवानांनी अटक केली. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास आंदोलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालय परिसरात केला.
या हल्ल्याचा आरोप अभाविपने फेटाळला असला तरी संशयाची सुई अभाविपच्या सभोवताली फिरत असल्यामुळे विद्यार्थ्यांवर झालेल्या याहल्ल्याबाबत देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्यासह किरण भुसारे, संध्या भगत, महेश शेळके, प्रफुल्ल पवार, स्वप्नील चुंभळे, गणेश गायधनी, मेघा दराडे, सुवर्णा दोंदे, दिव्या पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, नाशिकच्या अ. भा. वि. पच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर धावून येत वाईट साईट शिवीगाळ पोलीस यंत्रणेच्या समोर केली. मात्र, कुठलीही कारवाई न केल्याचे महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी म्हटले आहे.