Saturday, May 4, 2024
Homeनाशिकमेकॅनिकल गेटचे काम वारसा जपत व्हावे

मेकॅनिकल गेटचे काम वारसा जपत व्हावे

पंचवटी | वार्ताहर

होळकर पूलाच्या खाली सुरू असलेल्या मेकॅनिकल गेटच्या कामासाठी गोपिकाबाई पेशवे यांचा बंगला व दहन स्थळातील तुळशीवृंदावन तोडण्यासाठी मार्किंग करण्यात आले. तो भाग तोडण्यास विरोध करीत हा वारसा जपत गेटचे काम करण्यात यावे असे स्मार्टसिटीच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले…

- Advertisement -

गेली काही दिवसांपासून होळकर पूलाच्या खालच्या बाजूला मेकॅनिकल गेटच्या फाउंडेशनसाठी खोदकाम सुरू आहे. डायमंड कटरच्या साह्याने खडक कापून नंतर तो फोडण्यात येत आहे. काढलेल्या दगडांचा या परिसरात ढिग तयार करण्यात आला आहे.

काम सुरु असताना ज्या ठिकाणी गोपिकाबाईंचा तास म्हणून परिचित असलेल्या भागातील बांधकामावर या गेटच्या कामासाठी खोदकामासाठी खूणा करण्यात आल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. येथील परिस्थिती बघण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप, गोदाप्रेमी समितीचे अध्यक्ष देवांग जानी, पर्यावरणप्रेमी देवेंद्रनाथ पंड्या, स्मार्टसिटीचे अधिकारी शोएब सय्यद, संजय पाटील, कृष्णकुमार नेरकर, चिराग गुप्ता, ऋतुल जानी आदी उपस्थित होते.

शुक्रवारी (दि. १९) रोजी लेंडी नाल्याजवळ उभारल्या जाणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रिटेनिंग वॉलच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या स्थळ निरीक्षण समितीतील आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी होळकर पूलाखाली तयार होत असलेल्या मेकॅनिकल गेटची आवश्यकता आहे का असा सवाल केला होता.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी येथील ऐतिहासिक वारसा स्थळांवर खोदकाम करण्याच्या खूणा आढळल्याने या स्थळांना धक्का लागू नये यासाठी स्थानिकांकडून विरोध करण्यात आला.

माजी आमदार सानप यांनी स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्याशी फोनवरून संवाद साधीत स्मार्टसिटीचे होत असलेल्या कामांची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी स्थानिकांसमवेत बैठक घ्यावी, कामाच्या माहितीचे फलक लावावेत, किंवा ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून माहिती देण्यात यावी अशा सूचना केल्या.

सध्या ज्या ठिकाणी मॅकेनिकल गेटचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी नाशिक सिटी सर्व्हे कार्यालयातील डीएलआर मॅपनुसार ही जागा गोपिकाबाई पेशवे यांचा बंगला असा उल्लेख आहे. रेकॉर्ड ऑफ राइट्समध्ये गोपिकाबाई यांचे नाव आहे. गोपिकाबाई यांचे निवासस्थान व दहन स्थळ यांना धक्का न लावता काम करावे.

देवांग जानी, गोदाप्रेमी समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या