Monday, January 26, 2026
HomeनाशिकNashik News : कुंभमेळ्यात भाविकांची गणना, सुरक्षेसाठी एआय

Nashik News : कुंभमेळ्यात भाविकांची गणना, सुरक्षेसाठी एआय

नाशिक | फारुख पठाण | Nashik

आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी नाशिक शहरात (Nashik City) येणाऱ्या भाविकांची अचूक गणना करण्यास तसेच सुरक्षेच्या दृष्टीने संशयित व गुन्हेगार शोधण्यास अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा (AI Technology) वापर होणार आहे. या उपक्रमामुळे लाखो भाविकांच्या गर्दीतून एखाद्या व्यक्तीला काही मिनिटांत शोधणेही शक्य होणार आहे. नाशिक महापालिका, स्मार्ट सिटी कंपनी आणि शहर पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

- Advertisement -

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात (Simhastha Kumbh Mela) किती भाविक येऊन गेले याची अचूक माहिती या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होणार आहे. २०१५ च्या कुंभमेळ्यात फुट प्रिंट घेण्याची मशीन लावण्यात आली होती. पहिल्यांदा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कॅमेऱ्यात संख्या काय होणार आहे. दर सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक शहरात देश-विदेशातून लाखो भाविकांचा ओघ असतो. यामुळे अचूक गर्दीचा अंदाज घेणे, वाहतूक नियंत्रण, आरोग्य सुविधा, तसेच सुरक्षेची आखणी करणे ही मोठी जबाबदारी असते. यावेळी ही जबाबदारी अधिक अचूकपणे पार पाडण्यासाठी एआय आधारित सीसीटीव्ही प्रणाली कार्यरत केली जाणार आहे.

YouTube video player

शहरातील महत्त्वाच्या चौकांवर, घाट परिसरात, प्रमुख रस्त्यांवर, बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि प्रवेशद्वारांवर विशेष एआय सक्षम कॅमेरे बसवले जाणार आहेत. तर विशेष करून पंचवटी व रामकुंड तसेच अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हे एआय तंत्रज्ञानाचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. या कॅमेऱ्यांच्या मदतीने भाविकांची सतत गणना होईल. एआय प्रणाली गर्दीतील प्रत्येक व्यक्तीची उपस्थिती ओळखून रिअल टाइम डेटा तयार करेल. या आकडेवारीच्या आधारे महापालिका आणि पोलिस प्रशासनाला गर्दीचे नियोजन सोपे होईल. कुठे गर्दी वाढली, कुठे कमी झाली, कोणते रस्ते मोकळे आहेत याची माहिती लगेच उपलब्ध होणार आहे.

संयुक्त नियोजन

या संपूर्ण प्रकल्पासाठी नाशिक महापालिका (Nashik NMC) नाशिक स्मार्ट सिटी आणि शहर पोलीस यांच्यात समन्वय साधला जात आहे. स्मार्ट सिटीच्या निधीतून अत्याधुनिक एआय कॅमेरे, सव्र्व्हर आणि डेटा विश्लेषण प्रणाली उभारली जाईल. महापालिका त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल, तर पोलिसांकडून सुरक्षा नियंत्रण व कार्यवाही केली जाईल.

डेटा सुरक्षिततेवर भर

एआय तंत्रज्ञानाचा वापर करताना नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. मिळालेला डेटा केवळ सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनासाठीच वापरला जाणार असून, कार्यक्रम संपल्यानंतर त्याची सुरक्षितरीत्या नाश (डिलीट) प्रक्रिया केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

असाही उपयोग होणार

सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या धार्मिक सोहळ्यात लाखो लोकांची उपस्थिती ही सुरक्षेच्या दृष्टीने आव्हानात्मक असते. संशयित, फरारी गुन्हेगार, हरवलेली व्यक्ती अशा प्रकरणांत पारंपरिक पद्धतीने शोध घेणे वेळखाऊ आणि अवघड असते. परंतु यावेळी एआय तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होऊ शकणार आहे. यासाठी जर एखाद्या व्यक्तीचा फोटो किंवा जुनी इमेज उपलब्ध असेल तर ती एआय प्रणालीत अपलोड केली जाईल. एआय त्या इमेजला डिजिटल कोड (बारकोडसारख्या स्वरूपात) मध्ये रूपांतरित करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या थेट व्हिडिओ फिडमध्ये त्या चेहऱ्याचा शोध घेईल. गर्दीतून त्या व्यक्तीचा चेहरा ओळखताच त्याचे अचूक स्थान नकाशावर दिसेल आणि काही सेकंदात पोलिसांना सूचना मिळेल.

हरवलेल्या व्यक्ती शोधण्यासाठी उपयुक्त

कुंभमेळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हरवलेल्या व्यक्तींची प्रकरणे घडतात. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असणारे भाविक (Devotes) यांना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा जोडणे ही मोठी सामाजिक गरज असते. एआय तंत्रज्ञानामुळे अशा व्यक्तींना शोधणे जलद आणि सोपे होईल. फक्त त्यांचा फोटो प्रणालीत टाकला की, काही मिनिटांत ते गर्दीत कुठे आहेत याचा पत्ता लागेल.

ताज्या बातम्या

77th Republic Day 2026 : दिल्लीत कर्तव्य पथावर 30 विविध चित्ररथ,...

0
नवी दिल्ली | New Delhi आज भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा (77th Republic Day) केला जात आहे. यानिमित्ताने दिल्लीतील कर्तव्यपथावर लष्करी दलांकडून संचलन केले...