नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहर पोलीस आयुक्तालयातील (City Police Commissionerate) सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या (एसीपी) जबाबदारीत अखेर दिवाळीनंतर ‘भाकरी’ फिरली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशान्वये, नव्याने आयुक्तालयात हजर झालेल्या अद्विता शिंदे यांच्याकडे वाहतूक शाखेच्या एसीपी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, एसीपी संदीप मिटके यांच्याकडील यापूर्वीचे पाच पदभार ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. उर्वरित एकूणच ‘एसीपीं’च्या कार्यभारात फेरबदल करण्यात आले आहेत.
शहर पोलीस मुख्यालय आणि विशेष शाखा ही दोन सहाय्यक आयुक्तांची पदे अद्यापही रिक्त ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, सरकारवाडा विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन जाधव यांची मुंबई (Mumbai) येथील फोर्स वनच्या पोलीस अधीक्षक पदी बदली झाली. त्यामुळे रिक्त झालेल्या सरकारवाडा विभागात शेखर देशमुखांना नियुक्त केले आहे. तर परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करुन नाशिक शहरात नियुक्त झालेल्या अद्विता शिंदे (Advita Shinde) यांना वाहतूक शाखेत नेमण्यात आले आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांसह सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्तांच्या या नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
सहाय्यक आयुक्त – सध्या नेमणूक – नवीन पदस्थापना
सचिन बारी – नाशिकरोड – अंबड
शेखर देशमुख – अंबड – पंचवटी
सुधाकर सुरडकर – वाहतूक – सरकारवाडा
संगिता निकम – पंचवटी – नाशिकरोड
अद्विता शिंदे – एमपीए – वाहतूक
संदीप मिटके – गुन्हे, विशेष शाखा, मुख्यालय, सिंहस्थ कक्ष व पोलीस तक्रार प्राधिकरण सदस्य





