Wednesday, June 17, 2026
HomeनाशिकNashik News : चमत्कारी बाबाच्या 'रिल'मुळे वाद; आयुक्तांच्या भेटीवर अंनिसचा आक्षेप

Nashik News : चमत्कारी बाबाच्या ‘रिल’मुळे वाद; आयुक्तांच्या भेटीवर अंनिसचा आक्षेप

पोलीस महासंचालकांना निवेदन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उत्तरप्रदेशातील बरेलीत असलेल्या मनौना धामचे तथाकथित चमत्कारी बाबा ओमेंद्र चौहान महाराज हे नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) असताना त्यांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतांना केलेल्या रिलवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आक्षेप घेतला आहे.

- Advertisement -

चौहान यांना पोलिसांनी (Police) पुरविलेली सुरक्षा आणि त्यांचे आशीर्वाद घेतल्याप्रकरणी अंनिसने पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. मात्र, आयुक्तालयाने शिष्टाचाराचा भाग असल्याचे सांगून दावे फेटाळले आहेत. ओमेंद्र हे त्यांच्या सोशल मिडीया हँन्डल्सवर बाटलीतील मंतरलेले पाणी देऊन गंभीर व आजार बरे करणे, मनोविकारापासून मुक्ती, मृत व्यक्तीला जिवंत करणे या स्वरुपाचे चमत्कारिक दाव्यांचे व्हिडिओ अपलोड करतात. गत आठवड्यात ते त्र्यंबकेश्वरला दर्शनानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी आयुक्तालयात संदीप कर्णिक यांची भेट घेतली.

त्यावेळी ओमेंद्र यांनी आयुक्तांनाही मंतरलेल्या पाण्याची बाटली दिली. त्यावेळी आयुक्तांनी नमस्कार केला. या भेटीसंदर्भातील रिल सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले. या व्हिडिओमुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याची टीका अंनिसने केली आहे. त्यासंदर्भात पोलिस महासंचालकांना (Director General of Police) ई-मेल करण्यात आला असून, सरकारने या महाराजला सुरक्षा का पुरवली याची वली याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवेद‌नावर अंनिसचे डॉ. ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

नाशिक ही कुंभनगरी आहे. विविध साधू, संत, महंत व महाराज नाशिकमध्ये येतात आणि कामानिमित्त पोलिस आयुक्त कार्यालयास भेट देतात. त्यांचे स्वागत करणे, त्यांना योग्य सन्मान देणे, त्यांच्या भेटींचा समन्वय साधणे व त्यांचे आशीर्वाद घेणे, हा कर्तव्य व शिष्टाचार आहे.

संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक

ताज्या बातम्या

Nashik News : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा मृत्यू

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati पंचवटी परिसरातील स्वामीनारायण पोलीस चौकीसमोरील महामार्गावर भरधाव लक्झरी बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी...