Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Leopard News : वनविभागाच्या विरोधात नाशिकरोडला संतप्त नागरिकांचा रास्ता रोको आंदोलन

Nashik Leopard News : वनविभागाच्या विरोधात नाशिकरोडला संतप्त नागरिकांचा रास्ता रोको आंदोलन

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

गेल्या काही दिवसापासून येथील जयभवानी रोड (Jay Bhavani Road) परिसरात असलेल्या लोणकर मळा, पाटोळे मळा, मनोहर गार्डन या भागात सातत्याने दिवसा व रात्री बिबट्याचा (Leopard) संचार होत असतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या बिबट्यांना पिंजऱ्यात (Cage) बंद करण्याची मागणी करत जय भवानी रोड परिसरातील नागरिकांनी एकत्र येत वनविभागाच्या कार्यपद्धती विरोधात मोर्चा काढला. यावेळी संतप्त नागरिकांनी श्री तुळजा माता मंदिराजवळ रास्ता रोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला.

- Advertisement -

दोन महिन्यापूर्वी वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब या भागात नरभक्षक बिबट्याने दोन लहान बालकांचा बळी घेतला होता. त्याविरोधात देखील नागरिकांनी (Citizen) एकत्र येऊन वनविभागाच्या विरोधात मोर्चा काढून वनविभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुद्धा केले होते. त्यानंतर वनविभागाने (Forest Department) परिसरात १८ पिंजरे व १५ कॅमेरे लावले होते. याचा परिणाम म्हणून पाच दिवसापूर्वीच एका बिबट्याला वडनेर गेट परिसरात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते.

YouTube video player

वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब यासारखी परिस्थिती जय भवानी रोड परिसरात होऊ नये म्हणून येथील नागरिकांनी एकत्र येऊन जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) असलेल्या नेहरूनगर येथील श्री म्हसोबा महाराज मंदिरापासून या मोर्चाला प्रारंभ झाला. बिबट्या घरात, नागरिक दारात, अशा घोषणा मोर्चामध्ये देण्यात येत होत्या.

दरम्यान, या मोर्चाचे नेतृत्व योगिता गायकवाड, सागर निकाळे, किरण गायकवाड, प्रदीप कुमार छत्रिय, प्रीतम घोरपडे, बाळासाहेब डावखर यांच्यासह परिसरातील नागरिक व महिलांनी केले. हा मोर्चा के. जे. मेहता हायस्कूलरोड डावखरवाडी मार्गे जय भवानीरोड येथे जाऊन मोर्चाचा (Morcha) समारोप श्री तुळजाभवानी माता मंदिर येथे झाला. यावेळी सुमारे अर्धा ते पाऊण तास रास्ता रोको (Rasta Roko) करण्यात आला. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक वळविण्यात आली होती. तर घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. वनविभागाचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Crime News : पोषण आहार वाहतूक व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शालेय पोषण योजनेअंतर्गत काम करणार्‍या शालेय पोषण आहार वाहतूक व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याच्या उद्देशाने तत्कालीन सुपरवायझरने साथीदारांसह गोडावूनवर हल्ला करून वाहने फोडल्याची घटना...