Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : कुसुमाग्रज प्रतिष्ठानला दरवर्षी १० लाखाचे अनुदान - राज्य मंत्रिमंडळाचा...

Nashik News : कुसुमाग्रज प्रतिष्ठानला दरवर्षी १० लाखाचे अनुदान – राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानला विविध प्रकारच्या वाड्मयीन उपक्रमांचे आयोजन करण्य़ासाठी यंदाच्या आर्थिक वर्षापासून दहा लाख रुपये निधी देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मराठी साहित्याचा प्रसार आणि संवर्धनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ,मुंबई, विदर्भ साहित्य संघ, नागपूर, मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजी नगर, कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर या सात संस्थांना दरवर्षी दहा लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते.

या संस्था नियतकालिकांचे प्रकाशन, विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन, मराठी ग्रंथ निर्मितीसाठी विविध पारितोषके देणे, संदर्भ ग्रंथांचे प्रकाशन आदी विविध वाड्मयीन उपक्रमांचे आयोजन करतात. याचप्रमाणे कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडूनही कार्य केले जाते. त्यामुळे कुसुमाग्रज प्रतिष्ठानलाही दरवर्षी १० लाख रुपये निधी देण्यास मान्यता देण्यात आली.

ताज्या बातम्या

पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्यभरात पावसाने दडी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. पाऊस लांबल्याने केवळ एक टक्का धूळपेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने...