Saturday, July 27, 2024
Homeनाशिकमविप्रची आज वार्षिक सभा

मविप्रची आज वार्षिक सभा

नाशिक | प्रतिनिधी

मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सभासद व कार्यकारिणीच्या सहकार्याने कर्जफेडीसह संस्थेची विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांनी सांगितले.सत्ताबदलास वर्षपूर्तीनंतर पहिली वार्षिक सर्व साधारण सभा रविवारी ( दि.१०) दुपारी १ वाजता रावसाहेब थोरात सभागृहात होणार आहे. सभेच्या पार्श्व भूमीवर वर्षभरात केलेल्या कामकाजाची माहिती ठाकरे यांनी दिली.

- Advertisement -

यावेळी संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर , चिटणीस दिलीप दळवी,उपाध्यक्ष विश्र्वास मोरे आदी उपस्थित होते. कामकाजच बद्दल माहिती देताना ॲड ठाकरे म्हणाले की,मेडिकल कॉलेज कॅम्पस येथे औषध निर्माणशास्त्र (बी.फार्म.) पदवी महाविद्यालयास ६० प्रवेश क्षमतेसाठी मान्यता मिळाली आहे.

तसेच कर्मवीर अँड.बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स,डाटा सायन्स या नवीन कोर्स करिता ६० प्रवेश क्षमतेस मान्यता मिळाली आहे.मागील कार्यकारिणीने घेतलेले कर्ज देखील मोठ्या प्रमाणात फेडण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही केला आहे.

विनाअनुदानित कर्मचाऱ्यांचे वेतन देखील वाढविण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मविप्रच्या कृषी तंत्रनिकेतन विद्यालयास ४० विद्यार्थी संख्येसह मान्यता मिळाली आहे.एम. फार्म अभ्यासक्रमाच्या फार्माकोलॉजी व फार्माकोग्नसी या विषयाची प्रवेश क्षमता ०४ वरुन ०९ करण्यात यश आले आहे.

कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आय.टी.,कॉम्प्युटर व एम.बी.ए. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमता ६० वरून १२० ने वाढ झाली आहे. संस्थेचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.

संस्था विकासासाठी देणगी व निधी उभारण्यासाठी सीएसआर सेल स्थापन करणार आहे. संस्था स्तरावर रिक्रुटमेंट सेलच्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त रोजगार कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

भविष्यातील योजना…

: मविप्र विद्यापीठ स्थापन करणार.

: आय बी एम सोबत सामंजस्य करार प्रगती पथावर,

: ऑक्सफोर्ड सोबत सामंजस्य करार प्रगती पथावर

: ५० वर्षे पूर्वीच्या सर्व धोकादायक इमारती नव्याने बांधणार.

: आयुर्वेद / हॉर्टीकल्चर / पशुवैद्यक / दंत वैद्यक महाविद्यालये सुरु करणार.

: मिल्ट्री प्रीपेटरी स्कूल स्थापन करणार.

: एन.डी.ए. ट्रेनिंग सेंटर सुरु करणार.

: १३ मजली अद्ययावत मुलांचे वसतीगृह (उदाजी मराठा कॅम्पस) उभारण्याची प्रक्रिया सुरु करनार

: मध्यवर्ती कार्यालयासमोरील पार्किंग जागेत बहुमजली पार्किंगसह भव्य बहुउद्देशीय वास्तूचे मॅरेथॉन चौकात आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या