नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्हा परिषदेचा (Nashik Zilla Parishad) सन २०२५-२६ वा वित्तीय वर्षात ६० कोटी ८३ लाखाच्या अर्थसंकल्पाला (Budget) मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Ashima Mittal) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यलेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे, प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, प्रताप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत डॉ. वर्षा फडोळ यांच्यासह सर्व विभागप्रमुख बैठकीला उपस्थित होते.
या अर्थसंकल्पात (Budget) समाजकल्याण मागासवर्गीय यांच्या कल्याणकारी योजनांसाठी ५ कोटी २५ लाख, महिला व बालकल्याण ३ कोटी २६ लाख, दिव्यांग कल्याणसाठी २ कोटी ५० लाख, ग्रामीण पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्ती निधीस अंशदान ५ कोटी ५० लाख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुरुस्ती व इतर खर्च २ कोटी २० लाख इतर सर्व विभागाकरिता तरतूद केल्यानंतर शिल्लक राहणारी तरतूद राकम ४ कोटी २१ लाख असा ६० कोटी ८३ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा अर्थसंकल्प यावेळी सादर करण्यात आला.
या अर्थसंकल्पातील ठळक बाबींमध्ये अपघात व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शेती उपयोगी साहित्यपोटी अनुदान देण्यासाठी २५ लाख, बाचन प्रेरणा उपक्रम ग्रंथालय ग्रंथालयात पुस्तके मासिक, दैनिक, शासकीय संदर्भ पुस्तके, नियमावली खरेदी करून अद्ययावत करण्याकरिता ३ लाख, गड किल्ले पर्यटनस्थळांचे मार्गदर्शनासाठी प्रशिक्षण देण्याकरिता २ लाख, कृषी मिळावे प्रक्षेत्र भेटी व प्रशिक्षण दहा लाख शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीकरिता जास्तीत जास्त एक लाख मर्यादित अनुदान १ कोटी ५० लाख, कुपोषित मुलांसाठी तसेच गरोदर महिला व स्तनदा मातांसाठी किलबिल मेळावा अतिरिक्त आहार पुरवण्याकरिता १० लाख, शंभर टक्के अनुदानावर ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिलांना पिको फॉल शिलाई मशीनकरिता अनुदान ६५ लाख, ग्रामीण भागातील मागासवर्गीय स्त्री लाभार्थीकरिता व्यवसायासाठी मसाला कापड यंत्राकरिता अनुदान ६५ लाख देण्यात आले आहे.
तर अनुदानित वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अंथरूण पांघरूण पुरवणे १ कोटी १० लाख, मान्यताप्राप्त विशेष मुलांच्या अनुदानित विनाअनुदानित शाळेतील गतिमंद विद्याध्यांना शैक्षणिक संच पुरवणे ८ लाख, किशोरवयीन मुलींना व महिलांना त्यांच्या सर्वांगीण विकास व सक्षमीकरणासाठी स्वच्छता प्रशिक्षण जीवन कौशल्य व गृह कौशल्य विकास प्रशिक्षण देणे २५ लाख, स्मार्ट अंगणवाडी तयार करणे ८० लाख, प्रायोगिक तत्वावर दुर्गम भागाकरिता फिरते पशु चिकित्सालयाची स्थापना करणे १५ लाख, पशुवैद्यकीय दवाखान्यांचा काय पलट करण्याकरिता १ कोटी २७ लाख, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या देखभाल व दुरुस्ती व इतर अनुषंगिक खचर्चाकरिता २ कोटी २० लाख, ग्रामीण भागातील विद्याथीं, विद्यार्थिनीना जेईई, नीट परीक्षेसाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रम २ कोटी, ग्रामीण भागातील रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती ७ कोटी ७० लाख व पाझर तलाव पाटबंधारे दुरुस्ती १ कोटी ८५ लाख अशी तरतूद (Provision) करण्यात आली आहे.