नाशिक | विशेष प्रतिनिधी | Nashik
भारताच्या कृषी क्षेत्रात दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. पुण्याच्या आगरकर इन्स्टिटयूटने सुगंध (आरोमा) असलेला ऋएच ५१६ फ हा उन्नत वाण विकसित केला आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाच्या दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) तळेगांव येथील फार्मवर तीन वर्षापूर्वी प्रायोगिक तत्वावर २० आर क्षेत्रावर या वाणाची यशस्वी लागवड करण्यात आली. त्यामुळे भारतीयांना अफगाणिस्तानपेक्षा उच्चप्रतीच्या सुगंधी काळ्या बेदाण्यांची चव आता चाखायला मिळणार आहे. उत्पादन खर्च वजा जाता एकरी ४ ते ५ लाख रूपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र बेदाणा उत्पादक असोशिएशनचे अध्यक्ष कृषीभूषण तुकाराम बोराडे यांनी केला.
गेली ३७ वर्ष बोराडे बेदाणा (Raisin) उत्पादन घेत आहेत. त्या भकम अनुभवाच्या जोरावर त्यांनी हा दावा केला आहे. तळेगांव येथे यंदाच्या द्राक्ष हंगामात नवीन लागवड केलेल्या एच-५१६ फ या सुगंधी वाणाच्या ३५ एकरांवरील प्लॉटला नॅशनल अँग्रीकल्वर बोर्ड ऑफ दिल्लीचे संचालक माणिकराव पाटील, महाराष्ट्र बेदाणा उत्पादक असोशिएशनचे अध्यक्ष तथा कृषिभूषण तुकाराम बोराडे, ज्येष्ठ बेदाणा उत्पादक भूषण धनवटे, महाराष्ट्र द्राक्ष बागाईतदार संघाचे संचालक सोपानराव बोराडे यांनी आज भेट दिली. त्यावेळी या बाणाचे उत्पादन व गुणवत्ता अतिशय उत्कृष्ट दिसून आली आहे. गेल्या वर्षी द्राक्ष बागाईतदार संघाने १,६०० किलो द्राक्षे उत्पादनातून ५०० किलो उच्च प्रतीचा बेदाणा तयार केला त्या द्राक्षांमध्ये साखरेचे प्रमाण २५ ते २७ टक्के आढळून आले. तसेच तयार झालेल्या बेदाण्याला विशिष्ट प्रकारचा सुगंध आढळून आला. बी असलेल्या काळ्या बेदाण्याला बाजारात ३०५ रूपये किलो घाऊक भाव मिळाला, आपल्याकडेही द्राक्ष उत्पादकांनी हुएच-५१६फ वा नव्या सुगंधी वाणाची लागवड करून उत्पादन (Product) वाढवण्यास आणि आर्थिक लाभ घेण्यास मोठी संधी आहे.
आपल्याकडे या वाणाचे उत्पादन वाढल्यास अफगाणिस्तानातून बेदाणा आयात करण्याची गरज भासणार नाही. उलट आयातीतून खर्च होणारे परकीय चलन वाचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सद्यस्थितीत नाशिक, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतून २ लाख ५१ हजार टन हिरवा आणि पिवळा बेदाणा कंटेनरने निर्यात केला जातो. त्यापासून ५५० कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला (Country) मिळते. अफगाणिस्तानचे काळे बेदाणे नैसर्गिकरीत्या तयार होतात. त्यात नैसर्गिक साखर, लोह असते. आरोग्यासाठी चांगले असलेले हे बेदाणे खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे अफगाणिस्तानच्या काळ्या बेदाण्यांना भारतात जास्त मागणी आहे. द्राक्ष बागाईतदार संघाने विकसित केलेल्या रेड ग्रेप्स लागवडीचीही पाहणी करण्यात आली. भविष्यात गुलाबी रंगाची ही टेबल ग्रेप्स जातही उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या फायद्याची शकेल सद्यस्थितीत महाराष्ट्र द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब गडाख, मानद सचिव बबनराव भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी द्राक्ष उत्पादनात मोलाचे योगदान देत आहेत.
किफायशीर वाण
‘एच-५१६’ या सुगंधी वाणाच्या साडेतीन किलो द्राक्षापासून सरासरी एक किलो बेदाणा तयार होतो. या बेदाण्याचा घाऊक दर ३०५ रुपये किलो आहे. या वाणातून एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळते. त्यापासून ३ ते ३।। टन बेदाणा तयार होतो. त्याचा सर्व उत्पादन खर्च वजा जाता बेदाणा उत्पादनातून ४ ते ५ लाखाचे उत्पन्न मिळू शकते, अफगाणिस्तानचा मध्यम आकाराचा काळा बेदाणा २२० ते २३० रूपये किलो घाऊक तर किरकोळीत ४०० रुपये किलो दराने मिळते. मोठ्या आकाराचा काळा बेदाणा घाऊक दरात ४०० रुपये तर किरकोळ दरात ५०० ते ५५० किलोने विकला जातो.
द्राक्ष बागाईतदार संघाच्या क्षेत्रावर कमी उत्पादन खर्च असलेल्या ‘एच-५९६’ या वाणाच्या उत्पादनाचा यशस्वी प्रयोग करीत आहोत. शेतकन्यांना यातून चांगला आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न आहे.
कैलास भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ
एच-५१६’ हा द्राक्षाचा सुगंधी वाण पुण्यातील आगरकर या इन्स्टिट्यूटने विकसित केला आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादकांनी जातीची लागवड करून बेदाणा निर्मितीकडे वळावे.
माणिकराव पाटील, संचालक, नॅशनल अॅग्री. बोर्ड ऑफ दिल्ली