Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात फ्लेमिंगोचे आगमन

Nashik News : नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात फ्लेमिंगोचे आगमन

कारंजी खुर्द | वार्ताहर | Karanji Khurd

कच्छच्या रणातून हजारो किलोमीटरचा प्रवास करत यावर्षी फ्लेमिंगो पक्ष्यांचे नांदुरमध्यमेशश्वर (Nandur Madhyameshwar) पक्षी अभयारण्यात आगमन झाले. साधारणपणे देश विदेशातील मिळून जवळपास हजारो पक्षी अभयारण्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, परिसरात चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर फ्लेमिंगो मनसोक्त विहार करताना दिसत असल्याने पक्षिप्रेमी, निसर्गप्रेमी व पर्यटक जे आतुरतेने फ्लेमिंगोंची वाट पाहत होते, ते आनंदित झाल्याचे चित्र आहे.यावर्षी लांबलेला परतीचा पाऊस, त्यामुळे पाणथळ व दलदलीचा कमी असलेला भाग आणि गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) यामुळे पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे.

- Advertisement -

साधारण या महिनाअखेरीस किंवा जानेवारीत परदेशी पक्ष्यांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. दरवर्षी साधारणपणे नोव्हेंबरमध्ये हिमालयाच्या (Himalayas) पर्वतरांगांमधून तसेच पाकिस्तान, अफगाणिस्तान, युरोपमधून नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पक्षी येण्यास प्रारंभ होतो. साहजिकच हिवाळ्यात हे अभयारण्य पर्यटकांनी गजबजून जाते. मात्र, यावर्षी परतीचा पाऊस दीर्घकाळ चालला. साहजिकच त्यामुळे पाणथळ व दलदलीचा भाग तयार न झाल्याने पक्ष्यांना भक्ष्य शोधणे अवघड झाल्याने पक्ष्यांनी अभयारण्याकडे पाठ फिरवली होती.

मागील महिन्यात बऱ्यापैकी थंडी पडण्यास सुरू झाली आणि पक्षी अभयारण्याचे खास आकर्षण असणारे फ्लेमिंगो पक्षी दाखल झाले. याबरोबरच तलवार बदक, छोटा मराल, शिट्टीवाला बदक, हळदीकुंकू बदक, जांभळी पाण कोंबडी, ठिपकेवाला गरुड, दलदल ससाणा, सोनुला, वचक, जांभळा बगळा, राखी बगळा, तरंग, वारकरी, ठिपकेवाला पिगूळ, पाणकावळा, तिरंदाज आदी परदेशी पक्ष्यांबरोबरच आपल्याकडील पक्षीही अभयारण्य परिसरात विहार करताना दिसतात. सायंकाळी दाट वनराईत पक्ष्यांच्या किलबिलाटाने हा परिसर गजबजून जातो.

दरम्यान, यावर्षी उशिरा पक्षी येण्यास सुरुवात होऊ लागल्याने काही दिवसांतच पर्यटकांची (Tourists) गर्दी होईल.पक्षी निरीक्षणानंतर पर्यटक येथील मासे खाण्यास पसंती देतात, परिसरात मासे बनवून देण्याची खास पद्धत आहे.यामुळे हिवाळ्यात सहली येतात. पर्यटकांच्या सोयीसाठी वनविभागाने येथे सोयीसुविधा दिल्या आहेत. पक्षी निरीक्षणासाठी खास मनोरे व दुर्बिणी ठेवल्या आहेत. पक्ष्यांची इत्यंभूत माहिती देण्यासाठी येथे गाईड देखील कार्यरत आहेत.’

फ्लेमिंगोचे आगमन

गेल्या चार वर्षापासून नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात फ्लेमिंगो पक्षी आले नव्हते. चार वर्षांनी हजेरी लावल्याने पर्यटकांचे खास आकर्षण कच्छच्या रणा वरून येणारा तसेच चार फूट उंच, लांब चोच, उंच पाय, पंखाच्या खालून लाल रंग असा फ्लेमिंगो पक्षी आकाशात उडताना अग्निच्या ज्वालासारखा दिसतो, म्हणून यास अम्निपंख म्हणतात. तसेच हिमालयात रोहित नावाने ओळखला जातो.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...