Sunday, October 6, 2024
HomeनाशिकNashik News : काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; निरीक्षकांनी घेतल्या मुलाखती

Nashik News : काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; निरीक्षकांनी घेतल्या मुलाखती

नितीन ठाकरे, दशरथ पाटील इच्छुक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पुढील काही दिवसांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेसचे (Congress) निरीक्षक आमदार कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांनी जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघातील ६५ इच्छुक उमेदवारांच्या (Candidate) मुलाखती घेतल्या. दरम्यान, निवडणूक (Election) लढविण्यासाठी इच्छुक उमेदवाराची मोठी भाऊगर्दी एमजी रोडवरील काँग्रेस कार्यालयात शनिवारी पाहायला मिळाली. दरम्यान, नाशिक मध्य मतदारसंघात सर्वाधिक चुरस असून पक्षात नसलेले मविप्र सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे व माजी महापौर दशरथ पाटील यांनीही मुलाखत दिली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Rahul Gandhi : कोल्हापूरात राहुल गांधींचा काँग्रेस कार्यकर्त्याच्या कौलारु घरात पाहुणचार; कुटुंबीय भारावले

नाशिक मध्यमधून (Nashik Central) काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास दोघे इच्छुक आहेत.तर कोणत्याही पक्षाचे जागा वाटप ठरले नसले तरी काँग्रेसने सर्व मतदारसंघाची चाचपणी सुरु केली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी आमदार कुणाल पाटील हे निरीक्षक नेमण्यात आले असून महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेशच्या सुचनेनूसार पंधरा मतदारसंघातील इच्छुकांनी उमेदवारासाठी अर्ज घेतले होते. शनिवारी कुणाल पाटील व खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी पक्ष कार्यालयात दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पंधरा मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.या दोघांनी बंद दाराआड इच्छुक उमेदवाराशी चर्चा केली.

हे देखील वाचा : Rahul Gandhi : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं संविधान…”; राहुल गांधींचा कोल्हापूरातून मोदींवर निशाणा

दरम्यान, जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल ६५ इच्छूक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. प्रत्येक मतदारसंघात पाच ते सहा इच्छुक आहेत.मात्र सर्वाधिक उमेदवारीसाठी चुरस ही नाशिकमध्य व इगतपुरी व त्र्यंबकेश्वर मतदारसंघात पहायला मिळत आहे. नाशिकमध्यसाठी बारा तर इगतपुरी त्र्यंबकेश्वरसाठी १७ इच्छूक उमेदवारांनी मुलाखती देत तिकिटाची मागणी केली. यावेळी उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करु नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे शक्तिप्रदर्शन करुन दबावतंत्र टाकण्याचे उमेदवारांचे मनसुबे धुळीस मिळाले. दरम्यान, हा संविस्तर अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवला जाणार आहे.

हे देखील वाचा : वाशिमच्या सभेतून PM मोदींचा काँग्रेससह महाविकास आघाडीवर घणाघात; म्हणाले…

मुलाखतीमधील प्रश्न

१) पक्षासाठी किती वर्षापासून काम व योगदान
२) मतदारसंघाची राजकीय पार्श्वभूमी
३) जातीय समीकरणे
४) लोकसभेला पडलेले मतदान
५) काँग्रेससाठी असलेले वातावरण
६) मतदारसंघातील बूथ संख्या
७) मागील विधानसभेतील परिस्थिती
८) कार्य काय केले आहे?

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या