Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : तयारी कुंभमेळ्याची! दृकश्राव्य माध्यमातून प्रयागराजची पाहणी

Nashik News : तयारी कुंभमेळ्याची! दृकश्राव्य माध्यमातून प्रयागराजची पाहणी

१३ ते १५ दरम्यान शिष्टमंडळ देणार प्रत्यक्ष भेट

नाशिक | Nashik

नाशिक (Nashik) येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) तयारीसाठी प्रयागराज येथे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाहणी करण्यात आली. याबाबतचा सविस्तर अहवाल तेथील प्रशासनाकडून मागवण्यात आला असून, त्याचा अभ्यास करुन दि.१३ ते दि.१५ फेब्रुवारी दरम्यान शिष्टमंडळ प्रयागराज येथे प्रत्यक्ष पाहणीसाठी जाणार असल्याचे विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (Dr. Praveen Gedam) यांनी सांगितले.

- Advertisement -

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रयागराज येथे झालेल्या दुर्घटनांची माहिती घेऊन कोणकोणत्या भागातील सावधानतेच्या कोणकोणत्या उपाययोजनांची गरज आहे याबाबतची माहिती घेऊन कोणत्या क्षेत्रावर नाशिकला काळजी घेण्याची गरज आहे त्यादृष्टीने अभ्यास केला जाणार आहे. तसेच प्रयागराज येथे पर्वणीसाठी आलेल्या कोट्यवधी भाविकांच्या गर्दीचे नियोजन कसे केले जात आहे याची सविस्तर माहिती घेण्याच्या दृष्टीने दृकश्राव्य (Audio Visual) प्रणालीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी चाचपणी केली.

YouTube video player

दरम्यान, पालक सचिव एकनाथ डवले (Eknath Dwale) यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार साधुग्रामच्या भूमी अधिग्रहणाच्या दृष्टीने संबंधित विभागांना सुचना देण्यात आल्या. तसेच गर्दीच्या नियोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या बांबूच्या बरिकडींगखजी लोखंडी बौरे केडींगचा वापर करण्याच्या सुबनेवर तपशीलवार माहिती संकलित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना मंगळवारच्या बैठकीत दिले, त्यावर अधिका-यांनी काम करण्यास सुरुवात केली असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले.

नदी स्वच्छतेवर विशेष लक्ष

शुद्धीकरण न केलेले पाणी नदीत सोडल्याने गोदावरी प्रदूषित होत आहे. त्यासाठी मनपाने लाँग टर्म प्लॅन बनवलेला आहे. त्यातील दोन वर्षात होणारी कामे अग्रक्रमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यात पर्वणी काळात इंटर सेप्शनल ड्रेनेजच्या माध्यमातून नदीचे पाणी स्वच्छ कसे राहील यावर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याचे डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.

स्नानाची नाशिककरांनाही संधी

जगभरातून येणाऱ्या भाविकांना कुंभस्नानाची पर्वणी साधता यावी, या दृष्टीने प्रशासन नियोजन करीत असते. मात्र, त्यात प्रत्यक्ष नाशिककरांना सवलत नसल्याने त्यांची गैरसोय होते. ही बाब लक्षात आल्यामुळे यापुढे स्थानिक नागरिकांनाही यात सहभाग घेणे सोपे करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. शहरातील पार्किंगच्या ठिकाणांवरुन पर्वणी स्थानाजवळच्या जागेवर भाविकांसोबतच शहरातील विविध बसस्थानकांवरुन प्रवाशांना घेण्याची सवलत देण्याचा विचार केला जात असल्याचे डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...