नाशिक | Nashik
नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकपदी (Superintendent of Police Nashik Rural) पालघर जिल्ह्याचे (Palghar District) पाेलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने (Vikram Deshmane) यांची बृहन्मुंबईत मध्य प्रादेशिक विभागाच्या अपर पोलीस आयुक्तपदी बदली झाली होती. त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर यापदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांची नियुक्ती करण्यात आल्याने हा प्रश्न मिटला आहे.
दरम्यान, शुक्रवारी (दि.१६) राज्य शासनाने राज्यातील भारतीय पोलिस सेवेतील (Police Force) चौदा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये नाशिक ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचाही समावेश होता. देशमाने यांनी नाशिक पोलिस (Nashik Police) अधिक्षकपदाचा फेब्रुवारी २०२४ मध्ये पदभार स्विकारला होता. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करीत गुन्हेगारांची धरपकड केली. तसेच अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केली. पोलिस दलातील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी उपक्रम राबवले होते.