इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
तालुक्यात सुरूअसलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavay Rain) भावली धरण (Bhavali Dam) मागील वर्षापेक्षा १२ दिवस आधीच भरले आहे. जिल्ह्यातील (District) पहिलेच एकमेव भावली धरणातुन गुरुवारी सायंकाळ पासून धरणातून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. तर सन २०२३ हेच भावली धरण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरले होते.
यंदा मान्सूनला (Monsoon) लवकर सुरुवात झाल्याने भावली धरण भरले आहे. तालुक्याची (Taluka) अमृतवाहिनी समजल्या जाणाऱ्या दारणा नदीच्या उगमस्थानी दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असणारे भावली धरण काठोकाठ भरून ओसंडून वाहू लागले आहे.
दरम्यान, तालुक्यात अधून मधून बरसणाऱ्या पावसाने (Rain) कालपासून चांगलाच जोर धरल्याने इतर धरणाच्या साठ्यातही भरीव वाढ झाली आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील भावली, भाम, मुकणे, वैतरणा, दारणा, कडवा व वाकी या धरणसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. दरम्यान आत्ता पर्यंत इगतपुरी तालुक्यात (Igatpuri Taluka) ११९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.




