Saturday, October 3, 2026
HomeनाशिकNashik News: मोठी बातमी! नाशिकमध्ये महायुतीची सत्ता; भाजपचा महापौर तर शिवसेना शिंदे...

Nashik News: मोठी बातमी! नाशिकमध्ये महायुतीची सत्ता; भाजपचा महापौर तर शिवसेना शिंदे गटाचा उपमहापौर

नाशिक | प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून, आज (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता विशेष महासभेत नवीन महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे.

नाशिकमध्ये महापौर निवडीला काही वेळ शिल्लक असतानाच भाजपने शिवसेना शिंदे गटाला सोबत घेत महायुती म्हणून नाशिक महापालिकेतील सत्ता स्थापन करणार आहे. नाशिकमध्ये महापौर म्हणून हिमगौरी आडके तर उपमहापौर पदी शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची निवड होणार आहे. यासाठी भाजपकडून नगरसेवकांना महपौर पदासाठी हिमगौरी आडके-आहेर तर उपमहापौर या पदासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करण्याचे व्हीप जारी करण्यात आले आहे.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...