Saturday, June 15, 2024
Homeनाशिकगंगापुर-रोडच्या 'या' भागात मोठे झाड कोसळले

गंगापुर-रोडच्या ‘या’ भागात मोठे झाड कोसळले

नाशिक | Nashik

- Advertisement -

नाशिक शहरात गुरुवार सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. शुक्रवारी ही सकाळपासूनच पावसाने शहरात दमदार हजेरी लावली आहे. शहरातील विविध भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाच्या संततधारेमुळे नाशिकच्या गंगापुर धरणातून ही पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

या दरम्यान, शहरातील गंगापुर रोड भागात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. गंगापुर-रोडच्या विद्या विकास हॉस्पीटललगत असलेले मोठे झाड रस्त्यावर कोसळले आहे. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी दोन्ही बाजूची वाहतुक व्यवस्था यामुळे कोल्मडली आहे. ही घटना समजताच अग्निशमन विभागाला कळवण्यात आले असून अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून झाड हटवण्याचे काम सुरु आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या