Monday, July 27, 2026
HomeनाशिकKirit Somaiya : जन्म दाखल्यांचा बोगस कारभार? नाशिकमध्ये १८ हजार संशयास्पद नोंदी;...

Kirit Somaiya : जन्म दाखल्यांचा बोगस कारभार? नाशिकमध्ये १८ हजार संशयास्पद नोंदी; सोमय्यांचा दावा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) जन्मनोंदी ऑनलाईन करताना तब्बल १८ हजार नोंदी संशयास्पदरीत्या घुसवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महापौर व आरोग्य विभागाकडे केली आहे. सोमवारी (दि. १६) सोमय्या यांनी महापालिकेत महापौर हिमगौरी आहेर-आडके (Himgauri Aher-Adke) यांच्याशी चर्चा केली. बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर शहरातील जन्मनोंदींची सखोल छाननी गरजेची असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत (Press Confernce) त्यांनी थेट मनपाच्या जन्मनोंद प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नाशिक महापालिकेकडून २००१ नंतरच्या जन्मनोंदी ऑनलाईन केल्या जात आहेत. मात्र या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर बनावट व संशयास्पद नावे समाविष्ट झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला. हा सरळसरळ जन्म प्रमाणपत्रांचा घोटाळा आहे. संबंधित व्यक्तींकडे खरोखरच जन्मनोंद अस्तित्वात आहे का, याची चौकशी झाली पाहिजे. खोट्या नोंदी आढळल्यास दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

मालेगावमध्येही अशाच प्रकारच्या ३,९७७ खोट्या जन्म नोंदी सापडल्या असून, त्यापैकी हजाराहून अधिक जणांवर गुन्हे दाखल झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. नाशिकमध्येही अशीच परिस्थिती असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, सातपूर परिसरात शेख नायजा नूर मोहम्मद यांच्या नावावर सापडलेले जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचे तपासात उघड झाले असून, या प्रकरणात गुन्हा (Case) दाखल होणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.

आठवडाभरात चौकशी

मनपाच्या सातपूर विभागीय कार्यालयातून बनावट जन्म दाखल्याप्रकरणी तत्काळ चौकशी करून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून एका महिलेला बनावट जन्म दाखला दिल्याचा आरोप केल्यानंतर महापालिकेडून चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास जन्म-मृत्यू दाखला देणारे कर्मचारी व दाखल्यावर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

हिमगौरी आहेर-आडके, महापौर

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेतूनही विसर्ग वाढविला; लाभक्षेत्रात समाधान

0
अकोले | Akole उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने भंडारदरा खालोखाल महत्वपूर्ण असणारे निळवंडे धरणही शुक्रवारी भरले. पाण्याची आवक वाढतच असल्याने अखेर निळवंडे धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी काल...