Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : मुख्यमंत्री, रश्मी ठाकरेंवर गुन्हा का दाखल नाही?; भाजप पुन्हा पोलीस...

Video : मुख्यमंत्री, रश्मी ठाकरेंवर गुन्हा का दाखल नाही?; भाजप पुन्हा पोलीस मुख्यालयात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

भाजपच शिष्टमंडळ पोलीस आयुक्त दीपक पांडेंच्या भेटीला आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्या विरोधात दिलेल्या तक्रार अर्जावरून अद्याप गुन्हे दाखल का नाही अशी विचारणा पोलीस आयुक्तांना या पदाधिकाऱ्यांनी केली आहे….

- Advertisement -

तसेच 48 तास उलटूनही भाजप कार्यालय फोडणाऱ्यांना अटक न झाल्याने भाजप पदाधिकाऱ्यांचा संताप अनावर झाला असून त्यांनी पोलीस मुख्यालयात पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

अग्रलेखाची प्रती प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाकडे पाठवली असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिली. तर मुख्यमंत्री आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्यावरील तक्रारीबाबत उद्या (दि २७) रोजी आयुक्त भाजप पदाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या