Thursday, September 3, 2026
HomeनाशिकNashik News : राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्यादरम्यान भाजप आक्रमक; काळ्या फिती लावून...

Nashik News : राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्यादरम्यान भाजप आक्रमक; काळ्या फिती लावून जोरदार निदर्शने

नाशिक | Nashik

- Advertisement -

काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे आज (बुधवारी) नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) असून, ते काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या निवासी प्रशिक्षण शिबीरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या दहा दिवसांपासून नाशिकमध्ये संगठन सृजन अभियानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांचे निवासी प्रशिक्षण सुरु आहे. या प्रशिक्षण शिबीराच्या समारोपासाठी राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान राहुल गांधी नाशिकमध्ये आले असतानाचा दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन केले.

केंद्र सरकारने (Central Government) मांडलेल्या ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन विधेयकाला’ (महिला आरक्षण विधेयक) काँग्रेसने विरोध दर्शवल्याचा आरोप करत भाजपच्या महिला पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि महिला नगरसेवकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. यावेळी आमदार देवयानी फरांदे, महापौर हिमगौरी आडके-आहेर, रश्मी हिरे-बेंडाळे, शहराध्यक्ष सुनील केदार, नगरसेवक दिनकर पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनाच्या (Protest) पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, काँग्रेस कार्यालय आणि परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

केंद्र सरकारच्या ‘नारी शक्ती वंदन विधेयका’ला (महिला आरक्षण विधेयक) विरोध केल्याचा आरोप करत नाशिक भाजपच्या महिला पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्याचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे निषेध आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनादरम्यान भाजपच्या महिला कार्यकर्त्या आणि प्रमुख पदाधिकारी यांनी काळे कपडे परिधान करून तसेच हाताला काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करत आहेत. काँग्रेसने महिला आरक्षणाला विरोध करून महिलांच्या अधिकारांवर गदा आणली आहे, असा आरोप करत भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

महिलांना (Woman) राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देणाऱ्या विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या भूमिकेचा आंदोलकांनी तीव्र शब्दांत निषेध केला. राहुल गांधी नाशिकमध्ये येत असताना त्यांच्या पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. यावेळी काँग्रेसने महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते (BJP Worker) आंदोलनात सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते.

ताज्या बातम्या

मारहाण

Vidyanand Bapat: डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण

0
पुणे | Puneगणेशोत्सवातील डीजेच्या आवाजाविरोधात सातत्याने भूमिका घेणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना पुण्यात बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टिळक रस्त्यावरील कशाळे...