वावी | वार्ताहर | Vavi
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाने (Nagpur-Mumbai Samruddhi Highway) अवैधरित्या गोमांसची वाहतूक करणाऱ्या टोयोटा कंपनीच्या कारचा सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) सायाळे शिवारात अपघात (Accident) झाल्याने गोमांस तस्करीचा प्रकार उघडीस आला आहे. अपघातग्रस्त कार सुसाट वेगाने जात असताना अज्ञात वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज (मंगळवार) पहाटे छुप्या पद्धतीने समृद्धी महामार्गाने वैजापूरकडून मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या टोयोटा कंपनीची कार क्रमांक एमएच ०३ ए.एफ. ०४६३ या कारमध्ये अंदाजे सात ते आठ क्विंटल प्राण्यांच्या तस्करीचे गोमांस आढळून आले. मात्र, ज्या कारवर जाऊन गोमांसने (Beef) भरलेले वाहन होते ते वाहन फरार झाले आहे. तर टोयोटा कारचालक इरफान शेख (वय २५) रा. नवरंग सिनेमा अंधेरी मुंबई यास पोलिसांनी अटक केली असून अपघातग्रस्त गोमांस कारमध्ये प्लॅस्टिकच्या बँगांमध्ये भरलेले गोमांस गाडीच्या पुढील शिटवर व मागच्या डिक्कीत आढळून आले.
दरम्यान, यावेळी महामार्गावरील वाहतूक नियंत्रण कक्ष अधिकारी मिलिंद सरवदे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी वावी पोलिसांशी (Vavi Police) संपर्क साधला. त्यानंतर वावी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गोमांसने भरलेली कार ताब्यात घेऊन चालकास अटक (Arrested) केली. तर फरार गाडीचा सीसीटीव्हीद्वारे शोध घेतला जात असल्याचे समजते. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देविदास माळी करत आहे.