Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे,...

Nashik News : माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, अद्वय हिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

संस्था व व्यंकटेश को-ऑप. बँकेच्या पदाचा गैरवापर करत स्वतःच्या लाभासाठी बनावट कर्जखाते तयार करीत १४ लाखांचे कर्ज आपल्या बनावट स्वाक्षरीद्वारे काढण्यात आल्याची तक्रार उपशिक्षक विलास पगार यांनी दाखल केली. त्यावरून कॅम्प पोलिसांनी माजी मंत्री प्रशांत हिरे (Prashant Hiray) माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे (Apoorva Hiray) व अव्दय हिरे (Advay Hiray) यांच्यासह इतरांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. माजी आमदार अपूर्व हिरे भाजपवासी होण्याच्या तयारीत असतांनाच हा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

कॅम्प भागात वास्तव्यास असलेल्या व सद्यस्थितीत सुरगाणा येथील नुतन विद्या मंदिरात उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या विलास दिगंबर पगार यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात (Police Station) आज दुपारी दाखल केलेल्या फिर्यादीत व्यंकटेश बँकेतून ७ लाखाचे कर्ज आपण २०२२ मध्ये काढले होते. या कर्जाचे (Loan) किती हफ्ते भरले व कर्जबाकी आहे याची माहिती घेण्यासाठी २०२४ मध्ये बँकेत चौकशी केली असता दोन कर्जखाते असल्याची माहिती मिळाली. मात्र एकच कर्ज काढले असतांना दोन कर्जखाते कोणते त्याची माहिती मागितली असता ती बँकेने देण्यास नकार दिली. त्यामुळे उपनिबंधकांकडे तक्रार केली असता एक कर्जखाते ७ लाखाचे व दुसरे १४ लाखाचे असल्याचे दिसून आले. १४ लाखाचे हे कर्ज प्रकरण २८ मार्च २०१८ रोजी केले गेले. यासाठी कुठलेही तारण नव्हते.

YouTube video player

कर्जमंजुरी व खात्यात कर्ज रक्कम एकाच दिवशी जमा झाली व धनादेशावर आपल्या बनावट (Fake) स्वाक्षरीव्दारे ही रक्कम तिघांच्या नावावर वर्ग केली गेली. या कर्जफेडीसाठी आपल्याला कुठलीही नोटीस बँकेने दिली नाही. या बनावट कर्जखात्या संदर्भात उपनिबंधकांकडे तक्रार केल्यानंतर आपल्या नावावर काढलेले कर्ज एकरकमी खात्यावर भरण्यात आले आहे. आपल्या संमतीशिवाय आपले बनावट कर्जखाते काढले व कर्जमंजुर करत रक्कमेचा स्वतःच्या फायद्यासाठी प्रशांत हिरे, अपुर्व हिरे व अव्दय हिरे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी कर्जवाटपाचे नियम धाब्यावर बसवून वापर केला आहे. तसेच इतर २४ शिक्षक व सेवकांच्या नावावर देखील बनावट कर्ज काढले असल्याचे विलास पगार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केल्याने पोलिसांनी गुन्हा (Case) दाखल केला आहे.

आपल्यासह कुटूंबावर कॅम्प पोलीस ठाण्यात राजकीय सुडापोटी गुन्हा दाखल झाला आहे. व्यंकटेश बँकेच्या कर्ज वाटपात कुठलीही अनियमितता नाही. बँकेचे ऑडिट देखील संबंधित विभागातर्फे झाले आहे. कर्ज चालू असतांना संबंधित व्यक्तीने तक्रार दाखल केली नाही. कर्ज फिटून सहा महिने झाले आहेत. आपण उद्या सकाळी भाजपात प्रवेश करीत असल्याने आपल्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच मोठ्या राजकीय शक्तीच्या हस्तक्षेपाने हे खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. मात्र न्यायालयात न्याय मिळेल ही खात्री आहे.

अपूर्व हिरे, माजी आमदार

ताज्या बातम्या