Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik News : 'आरटीआय' टाकून खंडणीची वसुली; छावा सेनेच्या संघटकावर गुन्हा

Nashik News : ‘आरटीआय’ टाकून खंडणीची वसुली; छावा सेनेच्या संघटकावर गुन्हा

फोन पे व कॅश पैसे स्वीकारल्याचे निष्पन्न

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत (RTI) माहिती मागून व संबंधितांविरोधात खोटे अर्ज टाकून जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावत खंडणी उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत जि.प.च्या आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी बाळासाहेब गोविंद ठाकरे (५१, रा. कॉलेज रोड) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात छावा क्रांतीवीर सेनेचा मुख्य संघटक नितीन विष्णू सातपुते (वय ३८, रा. कोणार्कनगर, आडगाव शिवार) यांच्या विरोधात खंडणी उकळल्याची फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

ठाकरे यांच्या फिर्यादीनुसार, नोव्हेंबर २०२१ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेत (Nashik Zilla Parishad) बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवली. त्यामुळे ठाकरे यांना बडतर्फ करून वेतनाची वसुली व्हावी असा तक्रार अर्ज सातपुते यांनी टाकला होता. त्यामुळे बदनामी झाल्याने ठाकरे यांनी सातपुते यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, प्रशासनाने नेमलेल्या समितीत सातपुते यांचे आरोप सिद्ध झाले नाही. त्यानंतर संघटनेच्या विविध कार्यक्रमांसाठी सातपुते यांनी पैशांची (Mony) मागणी करीत तक्रार अर्ज केले. बदनामीची धमकी देत सातपुते यांनी ठाकरे यांच्याकडून २५ हजार रुपये फोन पे वरून तर ३० हजार रुपये रोख स्वरुपात घेतले. तसेच किशोर शिरसाळे यांच्याविरोधातही तक्रार अर्ज करीत धमकावत १२ हजार रुपये ऑनलाइन व ३२ हजार रुपये रोख स्वरुपात घेतले. त्यानंतरही सातपुते यांनी ठाकरे यांच्याकडे २ लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने सातपुते यांनी साथीदारांसह २७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून बदनामी केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

YouTube video player

अखेर वैतागून फिर्याद दिली

वारंवार खोटे, बनावट तक्रार अर्ज व माहितीचा अधिकार टाकून कारवाईची धमकी देत खंडणी मागत असल्याने ठाकरे यांनी सातपुते विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख हे तपास करीत आहेत. सातपुते याने आरोग्य विभागात गत पाच वर्षांपासून माहितीच्या अधिकाराचा गैरवापर केला असून शेकडो कर्मचारी आणि अधिकारी यांची वैयक्तिक स्वरूपाची माहिती मागवून खंडणी उकळली आहे. तसेच सातपुतेवर पूर्वीही असेच गंभीर गुन्हे नोंद असल्याचे समजते.

ठळक मुद्दे

* सातपुतेने संघटनेच्या लेटरपॅडवर निवेदने दिली.
* त्रास देणार नाही, म्हणूण अनेकदा पैसे उकळले.
* गुन्हा नोंद झाल्याने जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी निर्धास्त.
* जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरही सातपुतेचे आंदोलन.
* लेटरपॅड व इतर साहित्य जप्त होणार.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...