Sunday, November 17, 2024
Homeक्राईमNashik News : बडगुजर, हिरे समर्थकांवर गुन्हे; पैसे वाटपाच्या आरोपातून प्राणघातक हल्ले

Nashik News : बडगुजर, हिरे समर्थकांवर गुन्हे; पैसे वाटपाच्या आरोपातून प्राणघातक हल्ले

दोन जण ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नवीन सिडकोतील सावतानगरात (दि. १५) विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी व विरोधी पक्षातील उमेदवारांच्या समर्थकांत पैसे व स्लिप वाटपाच्या आरोप-प्रत्यारोपातून घडलेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यानुसार, एका गटातील दोघांना अटक करण्यात आली असून नगरसेवक संशयित मुकेश शहाणे पसार असल्याचे अंबड पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचे समर्थक सुमीत पगारे, अनिकेत शिरसाठ, सद्दाम शेख, बाळा निकम, मयुरेश बडगुजर, किशोर डोळस, बंटी शेख, मॉन्टी दळवी, अमोल शिरसाठ, पप्पू शेवाळे, आशीर्वाद उगले, स्वस्तिक अडांगळे, अविनाश गायकवाड, संजय गोसावी, सुयश पाटील, बालम शिरसाठ तसेच त्यांचे २५ साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. त्यातील सद्दाम व बाळा निकम यांना अटक करण्यात आली आहे.

तर महायुतीच्या उमेदवार व माजी आमदार सीमा हिरे यांचे समर्थक आणि नगरसेवक मुकेश शहाणे व त्यांचे पाच साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. सावतानगर येथील हिरे शाळेजवळ शुक्रवारी (दि. १५) दुपारी तीन वाजेच्या सुमारास महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचे वरील समर्थक व कार्यकर्ते मतदारांना चिठ्ठया वाटप करीत होते. त्यावेळी भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांचे समर्थक प्रदीप प्रल्हाद चव्हाण व शहाणे तिथे पोहोचले.तेव्हा शहाणेंसह चव्हाण व कार्यकत्र्त्यांनी बडगुजर समर्थकांकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा दावा करुन वाद घातला.

त्याचवेळी बडगुजर व सीमा हिरे आणि शहाणे समर्थकांच्या जमावाने एकमेकांवर प्राणघातक हल्ला चढविला. त्यात प्रदीप चव्ह्मण व बडगुजर समर्थक सद्दाम शेख जखमी झाले. यानंतर दोन्ही गटांच्या संतप्त पदाधिकाऱ्यानी तडकाफडकी अंबड पोलीस ठाणे गाठून कारवाईची मागणी केली. पोलीस ठाण्याबाहेरही दोन्ही गटांनी एकमेकांवर धावून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटविला. त्यानंतर रात्री उशिरा दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद नोंदविल्या आहेत.

आता नोटिसा अन् तडीपारी

घडलेल्या वादामुळे हिरे-बडगुजर शहाणे वैर वाढले आहे. त्यामुळे येत्या काळात म्हणजेत निवडणूक निकाल व नंतर पुन्हा गैंगवार भडकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे प्रतिबंध म्हणून पोलिसांनी आतापासूनच कठोर कारवाई अंमलात आणण्याचे पाऊल उचचले आहेत. त्यानुसार, दोन्ही गटांतील संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसांसह तडिपारीच्या कारवाईदा ससेमिरा मागे लागणार आहे. तर, प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात मुख्य संशयित असलेला भाजपा नगरसेवक शहाणे याला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी गेले असता तो सापडला नाही. तो पसार झाला असून शोध सुरु असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या